पावसाळ्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, आज कृष्णा नदीची पाणी पातळी जवळपास तीन फुटांनी वाढली आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून काल सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 75 हजारावरून 1 लाख क्यिुसेक करण्यात आला आहे. सध्या हे धरण 71.53 टक्के भरले आहे.
पावसाळ्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणामध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पावसाचे पाणी अलमट्टीत गतीने येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. कोल्हापूर व सांगली पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांमार्फत अलमट्टीच्या पाणी साठ्यावर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
ब्रेकिंग : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; आज शाळा बंद राहणार
पुराच्या कालावधीत महाराष्ट्रातून सुमारे साडेचार लाख ते पाच लाख क्युसेकने विसर्ग अलमट्टी धरणात होतो पण ते अलमट्टीतून केवळ 3 लाख विसर्ग केला जातो. याचा परिणाम फुगवट्यावर होतो. एक फुगवटा चढून दुसऱ्या फुगवट्यावर आल्याने पाणी तुंबते आणि पुरस्थिती निर्माण होते. यासाठी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग हा पाच लाखावर असणे गरजेचे असते पण तसे घडत नाही आणि अलमट्टीच्या पाण्याची उंची 513 च्यावर वाढते. याचा फटका बसतो. 2019 मध्ये तर राष्ट्रीय महामार्गावरच पाणी आल्याने महामार्ग बंद झाला. शेतीच्या नुकसानासह या भागातील अर्थव्यवस्था ठप्प होण्याचाही प्रकार झाला. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. हे निश्चितच विचारात घेण्यासारखे आहे. यावर दिर्घकालीन उपाय योजनांचीही गरज आहे.
ब्रेकिंग न्यूज : नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी : पिके पाण्याखाली
कृष्णा खोऱ्यांच्या पूर्व पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पातळीत वाढ होत आहे. कोयना धरणातून शुन्य, वारणा खरणातून 885 क्युसेक, दूधगंगा धरणातून 900 क्युसेक, पंचगंगा नदी, कुंभी धरणातून 550 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा खोऱ्यांतील धरणांमधून एकूण विसर्ग 2 हजार 335 क्युसेक आहे. कोयना धरणातून 75 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतरच विसर्ग सोडण्यात येईल, अशी माहिती कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती बेळगावच्या पाटबंधारे विभागातील अधिऱ्यांकडून देण्यात आली. सध्या कोयना धरणात 35 टीएमसी पाणीसाठा आहे.
लक्षवेधी बातमी : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांना फटका
या धरणाची क्षमता 123.8 टीमसी असून सध्या या धरणात पाणीसाठी 87.99 टीएमसी आहे. हे धरण सध्या 71.53 टक्के भरले आहे. या धरणामध्ये आता 1 लाख 4 हजार 852 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. अलमट्टी जवळील हिप्परगी धरणामधून 75 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. अलमट्टीमुळेच दक्षिण महाराष्ट्रात पूर येत असल्याचा समज असल्याने अलमट्टीतून जास्तीत जास्त पाणी सोडण्याचे नियोजन करण्याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे नक्की वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1