शेतकऱ्यांची बियाण्याबाबत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता राज्य सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. बोगस बियाणे विकणाऱ्यांला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी येत्या अधिवेशनात नवा कायदा करणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
लक्षवेधी पीक : अशी आहे अननस शेतीची व्यवस्थापन पद्धत
अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येते. पेरणीच्या हंगामात अशा अनेक घटना सातत्याने समोर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता राज्य सरकराने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार आहे. यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे. याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा केली आहे.

अकोला येथे दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमात बोलतांना कृषीमंत्री सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, ज्यांच्याकडे बोगस बियाणे, बोगस औषधे किंव्हा बोगस खते असतील त्यांनी ती तत्काळ नष्ट करावीत. याबाबत आपण राज्यपालांकडे पूर्ण रिपोर्ट देणार आहोत. त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार आहे.
मोठी बातमी : शेतकऱ्यांसाठी सरकार कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापणार
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आम्ही एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवला. त्यावेळी राज्यातील 16 हजार शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेतली. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याचा अभ्यास केला.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही खरीप हंगामाची आढावा बैठक आयोजित केली. यावेळी अकोला, जालना, परभणी जिल्ह्यातील आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी 87 ठिकाणी छापेमारी केली, ज्यात 68 ठिकाणी अनियमितता आढळून आली. तर काही ठिकाणी आमचे अधिकारी पैसे घेत असल्याची माहिती मिळाली. मी पोलिसांना फोन करून कारवाईत सहभागी होण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे घेऊन जाणार आहे. पोलीस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचे दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करण्याचा विचार आहे. यामुळे बोगसगिरी करणारे सर्व समोर येतील, असेही सत्तार म्हणाले.
चिंताजनक : बिपरजॉय चक्रीवादळाचा ‘या’ जिल्ह्यांना धोका ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03












Users Today : 12
Users Last 30 days : 850
Users This Month : 612
Users This Year : 1324
Total Users : 236773