यंदाचे दहावे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा) येथे शनिवार, 21 व 22 असे दोन दिवस आयोजित करण्यात आले असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. किशोर सानप तर उद्घाटक म्हणून सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित रहाणार असल्याची माहिती, अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली.
टिप्स : डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाह वास्तवाची जाणीव मराठी साहित्य विश्वाला होण्याच्या उद्देशाने शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या नऊ वर्षांपासून या उपक्रमात सातत्य राखण्यात आले असून, यंदाचे संमेलन दहावे असणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शेती साहित्य क्षेत्रातील क्रियाशील सृजन लक्षात घेऊन त्यांच्याप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे संमेलन गुरुकुंज सेवाश्रमाच्या पावनभूमीत होणार आहे.
संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप हे संमेलन अध्यक्षपदी राहतील. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करुन शेती उद्योगाला नवी दिशा देणारे ‘सह्याद्री फार्म’चे अध्यक्ष विलास शिंदे संमेलनाचे उद्घाटन करतील.
ब्रेकिंग न्यूज : हवामानातील बदलामुळे रब्बी पिके धोक्यात
विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे तसेच वऱ्हाडी कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांची या वेळी विशेष उपस्थिती राहील. संमेलनाच्या आयोजनाकरीता साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे, संयोजक दिलीप भोयर यांनी कार्यभार स्वीकारला असून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समित्यांमध्ये दिलीप भोयर, माधव गावंडे, जगदीशनाना बोंडे, विजय विल्हेकर, श्रीकांत पाटील पुजदेकर, सुधाकर थेटे, संदीप अवघड, दत्ता राऊत, सारंग दरणे, गणेश मुटे, मुकेश धाडवे, भाऊराव उमाटे यांचा समावेश असल्याचेही गंगाधर मुटे यांनी सांगितले.
मोठी बातमी : सावधान ! थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव होणार ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1