कोरोनाच्या महामारीमुळे ट्रॅक्टर उत्पादनामध्ये मोठी घट झाली होती. मात्र आता स्थिती सुधारत असून, देशातील ट्रॅक्टर उत्पादन आणि निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. ट्रॅक्टर आणि मेकॅनायझेशन असोसिएशनने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशामध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशामध्ये मे महिन्यात 81,940 ट्रॅक्टरची विक्री झाली. तर जून महिन्यात 94,477 ट्रॅक्टर विक्री झाली. म्हणजे ट्रॅक्टर विक्रीमध्ये मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ झाली असल्याचा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
हे नक्की वाचा : पावसामुळे म्हशी बांधल्या बायपासवर
यंदाच्या वर्षी जून महिन्यात ट्रॅक्टर उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. तसेच ट्रॅक्टर निर्यातीनेही उच्चांक गाठला आहे. ट्रॅक्टर उत्पादनाने आठ महिन्यानंतर एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. तसेच विक्रीमध्ये प्रत्येक महिन्यात वाढ होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते आहे. जून महिन्यात भारतातील ट्रॅक्टर निर्यातीने 12,849 चा विक्रमी उच्चांक गाठला आहे. मागील वर्षी याच कालावधीत निर्यात 12,690 वर झाली होती. तसेच सलग 13 व्या महिन्यात भारतीय ट्रॅक्टरच्या निर्यातीत दहा हजाराहून अधिक वाढ झाली आहे.

लक्षवेधी निणर्य : बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क
दरम्यान, हवामानशास्त्र विभागाने सलग चौथ्या वर्षी सरासरीइतका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर उद्योगावर त्याचा चांगला परिणाम होईल, असाही अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. यंदा मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये ट्रॅक्टरची विक्री वाढली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र विक्री अजून कमीच आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये देशांतर्गत बाजारात 1,10,399 ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. यंदा मात्र जून महिन्यात 94,477 ट्रॅक्टर्सची विक्री झाली आहे.
महत्त्वाचा निणर्य : आता पुन्हा नगराध्यक्ष, सरपंचाची थेट जनतेमधून

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1