Sugarcane Variety : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उसाची शेती केली जाते. लागवडीसाठी 86032 या उसाच्या वाणाची पसंती सर्वाधिक असते. मात्र आता याला पर्याय (options) ठरणारा 15012 हा नवा वाण गेल्यावर्षी प्रसारित (propagation) झाला असून, उत्पादनासह याची रिकव्हरीही चांगली असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
महत्त्वाची बातमी : बिकानेरच्या केंद्रीय कोरडवाहू फळ संशोधन केंद्राकडून डॉ. नवनाथ कसपटे यांची दखल
वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटबरोबर (Vasantdada Sugar Institute) राज्यातील अनेक संस्था उसाच्या वेगवेगळ्या जातींची निर्मीती करतात. नवीन फुले ऊस 15012 (एमएस 17082) या मध्यम पक्वतेच्या वाणाची निर्मिती फुले 265 आणि को – 94008 या वाणांच्या संकरातून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव (Central Sugarcane Research Centre, Padegaon) या ठिकाणी केली आहे. प्रथम संकर 2012 मध्ये केला होता, 2013 आणि 2014 मध्ये रोप निर्मिती आणि रोपातून निवड केली. त्यानंतर 2014 पासून 2021 पर्यंत स्थानिक, बहुस्थानीय चाचण्या (Tests) तीनही लागवड हंगामात लागवड ऊस आणि खोडवा पिकाच्या घेतल्या आहेत.
दरम्यान, 15012 या उसाच्या वाणाचा नऊ राज्यात अभ्यास केला. अहवालाच्या आधारे डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात (Dr. Balasaheb Konkan Agricultural University) संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या (Joint Agricultural Research and Development Committee) बैठकीत फुले ऊस 15012 या वाणाची पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली आहे.
हेही वाचा : शेतीच्या दृष्टीने हे आहे ; घटस्थापनेचे महत्त्व
याबाबत कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे (Krishi Vigyan Kendra Talsande) वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जयवंत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, 86032 वाणाला 15012 वाण पर्याय होऊ शकतो. हा नवीन वाण (New variety) गेल्यावर्षी प्रसारित झाले. जिल्ह्यात 500 शेतकऱ्यांकडे बियाणे असणार आहे. याचबरोबर ऊस संशोधन केंद्र कृषी विद्यालय बावडा येथे नोव्हेंबरपासून हे बियाणे (seeds) विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे तर शेतातील पाण्याची परिस्थिती पाहून उसाची लागण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या वाणाची गुणवैशिष्ट्ये (Characteristics) म्हणजे, फुले ऊस 15012 हा वाण मध्यम पक्वतेच्या 86032 या वाणापेक्षा 16 टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन देतो. शिवाय यापासून साखर उत्पादन (Sugar Producsan) 15.51 टक्के अधिक मिळाले. फुले 265 वाणाच्या खोडव्याच्या सरासरीची तुलना केली असता उत्पादन तोड मिळाले. याच्या साखर उत्पादनात 6 टक्के वाढ दिसून आली. उसातील व्यापारी शर्करा (Merchant Sugars) प्रमाण हे 86032 पेक्षा 0.4 युनिट आणि फुले 265 पेक्षा 0.8 युनिटने जास्त असल्याने साखर उत्पादन वाढीसाठी हे वाण चांगला आहे.
ब्रेकिंग : लम्पीच्या बचावासाठी जनावरांनाही पीपीई किट : सांगोल्यातील पशुपालकाचा प्रयोग
https://www.facebook.com/shetimitramagazine03