औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून महिन्याभरात 18 दरवाजे पुन्हा उघडले आहेत. सोमवारी ८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले तर मंगळवारी 10 दरवाजे 1 फुटापर्यंत उघडून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरणातून 20453 क्युसेकने विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून
सोमवारी 5 हजार 240 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात सांडव्याद्वारे 5 हजार 240 व जलविद्युत निर्मिती केंद्रामधून 1589 असा एकूण 6 हजार 829 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सोमवारी प्रकल्पात 93.38 टक्के पाणीसाठा होता. तर पाण्याची आवक 6 हजार 829 क्यूसेकने सुरू होती. तितकेच पाणी सोडण्यात येत होते. दुसरीकडे माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्याव्दारे 600 क्युसेक विसर्ग गेल्या 19 दिवसांपासून सुरू आहे.
ब्रेकिंग न्यूज : अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
दरम्यान, मंगळवारी सकाळी 10 ते 10.30 वाजेदरम्यान 18 दरवाजांतून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे 9432 व 9432 क्युसेक मिळून 18864 क्युसेक, जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक असा एकूण 20453 क्युसेक विसर्ग सुरू होता. प्रकल्पाची निर्धारित पाणी पातळी कायम ठेवून विसर्गामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, असे प्रकल्प प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लक्षवेधी बातमी :
गव्हाच्या किंमती वाढणार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1