एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा वादळी पावसाचा तडाखा बसल्याने जळगावातील शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान केळीचे झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

ब्रेकिंग न्यूज : पंजाबराव डख यांचा जून महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर
जळगाव, चोपडा, धरणगाव, पाचोरा, भडगाव अशा पाच तालुक्यांत नुकसान झाले आहे. यात एकूण ४९ गावांतील 1 हजार 376 शेतकरी बाधित झाले आहेत. केळीचे सर्वाधिक 2 हजार 11 हेक्टर नुकसान झाले आहे. पपईचे पाच हेक्टर, तर लिंबाचे दहा हेक्टरवर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा येथे बुधवारी (ता. 8 ) मोठे नुकसान झाले होते. त्यात 24 गावांतील 584 शेतकरी बाधित होऊन 398 हेक्टरवर नुकसान झाले होते. आता पाच तालुक्यांत केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांवर झाडे पडली आहेत.
आनंदाची बातमी : अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल
चोपडा तालुक्यांत 517 हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले असून, धरणगाव तालुक्यांत 15 हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यांत 1426 हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यांत 18.80 हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे. तर भडगाव तालुक्यांत 34.33 हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे या पाच तालुक्यांत मिळून 2011.13 हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे.
लक्षवेधी बातमी : पीकविम्याबाबतची कॉर्पोरेटधार्जिनी नीती सरकारने बदलावी : पी. साईनाथ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1