राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने दि. 21 ते 28 मे दरम्यान राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न सन्मान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या सप्तहात राज्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 26 शेतकऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी जावून सन्मानीत करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी दिली आहे.
फायद्याच्या टिप्स : उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी
रविवार, दि. 21 मे रोजी सकाळी 8.30 वाजता अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा गोविंदपूर येथील दुग्ध उत्पादक शेतकरी व युवा उद्योजक विजय पंडीतराव भुयार यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. दुपारी 10.30 वाजता तिवसा तालुक्यातील उबंरखेड येथील उत्कृष्ट तिफनकरी नामदेवराव धवने यांनाही त्यांच्या निवासस्थानी जावून सन्मानीत करण्यात येणार आहे. तर दुपारी 3.00 वाजता नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील बोर्डा (संत्रापूर) येथील अस्मिता फार्मवर प्रयोगशील व सेंद्रिय उत्पादक शेतकरी सैय्यद मुझफ्फर हुसैन व खापरी (नागपूर) येथील प्रयोगशील शेतकरी प्रशांत दुरुगकर यांना राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

सोमवार, दि. 22 मे रोजी सकाळी 8.30 वाजता विर्शी (ता. भातकुली) येथील उत्कृष्ट पशु संवर्धक डॉ. भानुदास सुचे यांना त्यांच्या निवासस्थानी सन्मानीत करण्यात येणार आहे. दुपारी 10.30 वाजता अकोला येथील पशु वैद्यकिय संशोधक डॉ. शाम देशमुख यांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता बार्शीटाकळी (जि. अकोला) येथील प्रयोगशील शेतकरी अनुप बगाडे यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर दुपारी 4 वाजता वाशीम जिल्ह्यातील मनोरा येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
महत्त्वाची माहिती : उन्हाचा चटका वाढतोय ; अशी घ्या आरोग्याची काळजी !
मंगळवार, दि. 23 मे रोजी सकाळी 9 वाजता देवणी (जि. लातूर) तालुक्यातील वलांडी येथील गाव कारभारी (सरपंच) पुरस्कार प्राप्त सरपंच सौ. राणीताई राम भंडारे यांना त्यांच्या निवासस्थानी जावून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता मालेगाव (जि. सातारा) येथील मे. अंजिक्यतारा शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
बुधवार, दि. 24 मे रोजी सकाळी 10.30 वाजता भातुकली (जि. अमरावती) तालुक्यातील जळका (हिरापूर) येथील उत्कृष्ट बैलजोडी मालक यांचा सन्मान व बैलजोडीचे पुजन करण्यात येणार आहे.

गुरुवार, दि. 25 मे रोजी सकाळी 9 वाजता अमरावती जिल्ह्यातील पुसद येथील उत्कृष्ट बैलजोडी मालक डॉ. नरेंद्र देशमुख यांचा सन्मान करून त्यांच्या बैलजोडीचे पुजन करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता हरताळा (अमरावती) प्रतिष्ठानच्या वतीने खरीप पूर्व शेतकरी मार्गदर्शन संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध किटक शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अनिल ठाकरे, उत्कृष्ट कृषी पत्रकार अमर घटारे व टरबूज उत्पादक शेतकरी विपीन अशोकराव इसळ (रा. खानापूर) यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.
महत्त्वाची बातमी : शेतीचा खर्च कमी करण्यासाठी समिती नेमणार : शिंदे
यावेळी हरताळा येथील सामाजिक कार्यकर्ते व क्रिषामी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजून शेतकर्यांना बियाणे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार, दि. 26 मे रोजी सकाळी 8.30 वाजता चांदूर रेल्वे (अमरावती) तालुक्यातील नया सावंगा येथील उत्कृष्ट सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते राहुल बेलसरे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. दुपारी 10.30 वाजता चांदूर रेल्वे (अमरावती) तालुक्यातील शिरजगांव कोरडे येथील उत्कृष्ट महिला उपसरपंच संगिताताई बद्रे यांना गाव कारभारी पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता धामणगाव रेल्वे (अमरावती) तालुक्यातील नायगाव येथील हरभरा उत्पादक शेतकरी हमंत ढेमरे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. तर दुपारी 2.30 वाजता तिवसा (अमरावती) तालुक्यातील दुर्गवाडा येथील युवा शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप ढोले तर 4.30 वाजता मोर्शी (अमरावती) तालुक्यातील नेर पिंगळाई येथील अल्पभूधारक बागायदार शेतकरी पुरुषोत्तम श्रीखंडे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
शनिवार, दि. 27 मे रोजी सकाळी 9 वाजता चांदूर बाजार (अमरावती) तालुक्यातील माधान येथील उत्कृष्ट कृषी पत्रकार सुयोग गोरले, 10.30 वाजता देऊळवाडा येथील प्रयोगशील शेतकरी मयुर प्रविणाराव देशमुख, दुपारी 1 वाजता बोदड येथील संत्रा उत्पादक शेतकरी व मार्गदर्शक प्रा. आमदास भोजने यांना तर दुपारी 4 वाजता अंजनगाव सुर्जी येथील केळी उत्पादक शेतकरी आशिक अंसारी व महिला शेतकरी संगिताताई दुधे यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
महत्त्वाची माहिती : रेशीम शेती : अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न घ्या !
रविवार, दि. 28 मे रोजी दुपारी 3 वाजता डहाणू (जि. पालघर) येथील फळ बागायतदार शेतकरी प्रविण वासुदेव बारी यांना राज्यस्तरीय राजीवगांधी कृषीरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

या राजस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराच्या निवड समितीमध्ये पोर्णिमाताई सवाई, अविनाश पांडे, मिलिंद फाळके, प्रा. अमर तायडेश जावेद खान, दिलीप काळे, जयसिंगराव देशमुख, भैय्यासाहेब निचळ, अनिल ठाकरे, प्रा. हेमंत डिके, नामदेव वैद्य यांनी काम पाहिले आहे.
महत्त्वाच्या टिप्स : खजूर शेतीच्या परफेक्ट टिप्स !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1