रायगड जिल्ह्यातील 26 हजार शेतकरी पीएम किसानसाठी अपात्र

0
397

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी 6 हजार रुपये देण्यात येतात. तीन समान हप्त्यात हे पैसे थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येतात.

हेही वाचा : खारीपासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा वेळेत द्या : कृषीमंत्री दादाजी भुसे

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेणारी रायगड जिल्ह्यातील तब्बल 26 हजार लोक योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आलेली 11 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक प्रसारमाध्यमात यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाले आहे.

महत्त्वाचा निणर्य : कृषी खात्यातील योजनांचे नियोजन आता एप्रिलपासून

पीएम किसान ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. रायगड जिल्ह्यातील (महाराष्ट्र) 26 हजार अपात्र लोकांची नावे या योजने अंतर्गत नोंदवण्यात आली होती. या योजने अंतर्गत 11 कोटी रुपयांचा निधीही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. हा निधी लवकरच सरकारकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे नक्की वाचा : कर्जमाफीमुळे शेतकरी अधिक कर्जबाजारी होण्याची शक्यता : नाबार्डचा अहवाल

रायगड जिल्ह्यातील 26,618 लोक या योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर आले आहे. आजवर त्यांच्या बँक खात्यांमध्ये 11 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. लवकरच ती परत केंद्र सरकारकडे वळवण्यात येणार असल्याचे रायगडचे तहसीलदार सचिन शेजल यांनी म्हटले आहे.

लक्षवेधी बातमी : अन्यथा ऊस उत्पादकांवरही आत्महत्या कारण्याची वेळ येईल : गडकरी यांचे भाकीत

या 26,618 लोकांपैकी 4509 लोक आयकर भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडून 3.81 कोटी रुपये येणे असून त्यातील 2.20 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. 22,109 अपात्र लोकांकडून 7.65 कोटी रुपये वसूल करायचे आहेत, त्यातील केवळ 34.54 लाख रुपयेच वसूल करण्यात आले असल्याचेही शेजल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

महत्त्वाची बातमी : खेड्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारचा 9 कलमी कार्यक्रम

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 4]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here