सध्या शेतकरी अनेक समस्येने अडचणीत असताना दुष्काळात 13 वा महिना अशी अवस्था नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेलेल्या टोमॅटोचे पैसेच व्यापार्याने शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. सर्वसाधारण 20 दिवसापासून टोमॅटो खरेदीचे सुमारे 34 शेतकऱ्यांचे तब्बल 31 लाख रुपये न दिल्याने संबंधीत आडतदार व व्यापाऱ्याविरुद्ध पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक बाजार समितीत आडतदार, व्यापारी असलेल्या पती-पत्नीने जवळपास 34 शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला होते. मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम संबंधीत शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची तब्बल 31 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. बाजार समितीच्या वतीने याप्रकरणी प्राधिकृत केलेले कर्मचारी रवींद्र बद्रीनाथ तुपे यांनी याबाबत पोलीसात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार संशयित आडतदार पुष्पा विलास शिंदे व व्यापारी विलास बाबुराव शिंदे (रा. दिंडोरी रोड) या दांपत्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे नक्की वाचा : गटारी म्हणजे नक्की काय ?
टोमॅटो उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ढेमसे यांच्यासह इतर 34 शेतकऱ्यांनी 1 ते 23 जुलै या कालावधीत बाजार समितीमध्ये टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. त्यावेळी संशयित शिंदे दांपत्याने लिलाव पद्धतीने टोमॅटो खरेदी केले. मात्र त्याबदल्यात शेतकऱ्यांना सुमारे 31 लाख रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फायद्याच्या टिप्स : मका पिकावर लष्करी अळीचा हल्लाबोल !
दरम्यान, बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटोचे पैसे शेतकऱ्यांना न दिल्याने बाजार समितीने संबंधीत आडतदार व व्यापाऱ्याचे परवाने रद्द करण्यासह 8 लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे. व्यापाऱ्याने यापेक्षा जास्त रक्कम थकवल्याची शंका व्यक्त केली जात असून, याबाबत बाजार समितीकडे तक्रारी अजून वाढत असल्याचे समजते.
लक्षवेधी बातमी : 24 दिवसांच्या काळात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1