यंदा मान्सून लांबला त्यात पावसाळा सुरू होऊन तब्बल एक महिना झाला तरी दमदार पाऊस झालेला नाही. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पाऊस झाला नसल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे राज्यातील जवळपास 36 हून अधिक धरणे अद्यापही कोरडीच आहेत.
हेही वाचा : हळदीच्या वायद्यांमध्ये मोठी तेजी
राज्यात 139 मोठी धरणे (प्रकल्प) आहेत. शिवाय 260 मध्यम प्रकल्प तर 2590 लघु प्रकल्प असे एकूण 2590 प्रकल्प आहेत. सध्यस्थितीला राज्यातील 2590 प्रकल्पांमध्ये सुमारे 318 टीएमसी (9013.48 दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी 22 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात पाव टक्क्यांनी घट झाली असल्याची स्थिती आहे.

गेल्या वर्षी याच काळात 27.31 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मन्सून उशिराने दाखल झाला असून त्याची प्रगती संथच आहे. अजूनही राज्यात सर्वदूर व समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी कमी-अधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र धरणातील पाणीपातळीत वाढ होण्यासाठी जोरदार व सर्वदूर पावसाची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. येत्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू होऊन पाणीपातळीत वाढ होईल अशी अपेक्षा लागून राहिली आहे.
गुडन्यूज : राज्यात पुढीचे ५ दिवस मुसळधार ते अती मुसळधार ?
राज्यातील कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३९ मोठी धरणे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची फारशी आवक झालेली नाही. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. सध्या मोठ्या प्रकल्पांत 229 टीएमसी म्हणजेच सरासरी 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

यंदा अमरावती विभागातील धरणात 32 टीएमसी म्हणजेच 38 टक्के, औरंगाबाद विभागातील धरणात 51 टीएमसी म्हणजेच 32 टक्के, पुणे विभागातील धरणात 40.27 टीएमसी म्हणजेच 9 टक्के, कोकणातील धरणात 23 टीएमसी म्हणजेच 26 टक्के, नागपूर विभागातील धरणात 49 टीएमसी म्हणजेच 40 टक्के, नाशिक विभागातील धरणात 33.72 टीएमसी म्हणजेच 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
मोठी बातमी : आता फक्त 1 रुपयात पीक विमा

https://www.facebook.com/shetimitramagazine03













Users Today : 18
Users Last 30 days : 771
Users This Month : 96
Users This Year : 808
Total Users : 236257