कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३८ कोटींचा निधी मंजूर

0
1530

शेतीकामासाठी होणारी मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरणावर भर दिला असून, कृषी यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी यंत्रिकीकरण उप अभियान सुरू केले आहे. या योजनेसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना २०२०-२१ साठी हा निधी मंजूर केला असून, यापैकी १९ कोटी रुपये त्वरीत वितरीत करण्यास मंजुरी देखील दिली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, टॅक्टर किंवा पॉवर टिलरवर चालणारी शेतीची अवजारे, बैल चलित अवजारे किंवा यंत्र, मनुष्य चलित अवजारे किंवा यंत्र, प्रक्रिया संच, फळबागेसाठी लागणारी अवजारे किंवा यंत्र, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे किंवा यंत्र, स्वयंचलित यंत्र, तसेच काढणीपश्‍चात लागणारी अवजारे किंवा यंत्र याबरोबरच शेतीकामासाठी लागणारी इतर अवजारांसाठी अनुदान उपलब्ध होणार आहे.

सध्या शेतीकामासाठी हवे तेवढे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने शेतीमधील मशामतीच्या कामासाठी यांत्रिकीकरणाचा उपयोग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतीची मशागत, पिकाची पेरणी, पिकाची काढणी, औषधांची फवारणी अशी सर्वच शेतीकामे आता कृषी अवजाराच्या मदतीने केली जातात. त्यामुळे शेतकर्‍यांना अजून प्रत्साहित करण्यासाठी उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीने हा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

ज्या भागात शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहचविणे हा खरा या कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानाचा मुख्य उद्देश असून, यासाठी प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारांमध्ये जागरुकता निर्माण करणे, अवजाराच्या खरेदीसाठी अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेसाठी ३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी १९ कोटी रुपये त्वरीत वितरीत करण्यास मंजुरी देखील दिली आहे.

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4.7]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here