Natural Farming : आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि तामिळनाडू या आठ राज्यामध्ये सुमारे 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली (Natural Farming) आणण्यात आली असून, यामध्ये आंध्र प्रदेश (Madhya Pradesh) आघाडीवर आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेला दिली.
मोठी बातमी : हळदीचे भाव महिन्यात दुप्पट : भाव आणखी वाढणार
केंद्र सरकार 2019-20 पासून परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत (Conventional Agriculture Development Scheme) भारतीय प्राकृत कृषी पद्धती (BPKP) या उप-योजनेद्वारे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत असल्याचे सांगून तोमर म्हणाले की, आतापर्यंत 8 राज्यामध्ये 4.09 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले गेले आहे.
आंध्र प्रदेशात सुमारे 1 लाख हेक्टर, मध्य प्रदेशात 99 हजार हेक्टर, छत्तीसगडमध्ये 85 हजार हेक्टर, केरळमध्ये 84 हजार हेक्टर, ओडिशामध्ये 24 हजार हेक्टर, ओडिशामध्ये 12 हजार हेक्टर, हिमाचल प्रदेशमध्ये 12 हजार हेक्टर, झारखंडमध्ये 3 हजार 400 हेक्टर तर तामिळनाडूत 2 हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यात आली असल्याची माहिती तोमर यांनी यावेळी दिली.

नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त (Chemical Free) असल्याचे सांगून, तोमर म्हणाले, पशुधन आणि स्थानिक संसाधनांचा वापर करून एकात्मिक शेती (Integrated Farming) आणि पशुपालन (Animal Husbandry) पद्धतीवर आधारित आहे. नैसर्गिक शेती (Natural farming) ही काळाची गरज आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी होतो, तसेच नैसर्गिक शेतीमधील उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळत असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी यावेळी केला.
महत्त्वाची माहिती : गोगलगाय नियंत्रणासाठी या करा उपाययोजना : कृषी विभागाचा सल्ला

https://www.facebook.com/shetimitramagazine03