सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील चिंदर (ता. मालवण) येथे गेल्या तीन दिवसांत येथील 31 पशुपालकांच्या तब्बल 41 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुभवार्ता : राज्यात उद्यापासून पाऊस ?
हा विषबाधेचा प्रकार असून, चाऱ्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. ऐन खरीप हंगाम सुरू असताना हा प्रकार झाल्यामुळे पशुपालक हवालदिल झाले आहेत. अचानक आलेल्या या संकटामुळे पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिंदर (सिंधुदुर्ग) येथे जनावरांना तीन दिवसांपूर्वी अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर एक एक जनावराचा मृत्यू होऊ लागला. एका पाठोपाठ एक अशी 41 जनावरे अचानक झालेल्या त्रासाने मृत झाली. अवघ्या तीन दिवसात 31 पशुपालकांच्या तब्बल 41 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुपालकांमध्ये घबराट निर्माण झाली.
महत्त्वाच्या टिप्स : डाळींबाच्या मृग बहाराचे परफेक्ट व्यवस्थापन
यामुळे चिंदर गावातील पशुपालकांना मोठा फटका बसला असून, या घटनेची माहित मिळाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे पशुसवर्धंन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी परिस्थितीची आढावा घेतला असून, चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाल्यामुळेच जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवाल तपासणीकरिता पाठविण्यात आला असून, पुणे प्रयोगशाळेचे पथक येऊन मृत जनावरांचे आवश्यक रक्त नमुने, चारा नमुने घेणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर या 41 जनावरांचे मृत्यूचे खरे कारण पुढे येईल, असे समजते.
लक्षवेधी पीक : 35 दिवसात कोथिंबीरीचे 6 टन उत्पादन तंत्र

https://www.facebook.com/shetimitramagazine03