Marathwada News : मराठवाड्याचा (Marathwada) कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) जाहीर केला.
ब्रेकिंग : यंदा राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महसूल विभागाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे नामकरण (Nomenclature) धाराशिव (Dharashiv) केल्याचे जाहीर केले. या नामकरणाबाबतची अधिसूचना जाहीर झाल्याने, या दोन्ही नामकरणांवर शिक्कामोर्तबचे झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येईल. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील 300 वर्षे जून्या तीन पुलांचे नुतनीकरण करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या (Marathwada Liberation Struggle) अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 2016 नंतर यंदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली.
या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा, (Water Resources) सार्वजनिक बांधकाम, (Public Works) नियोजन, (Planning) ग्रामविकास, (Rural Development) कृषी (Agriculture) तसेच पशूसंर्वधन (Animal Husbandry) आदी विभागांशी निगड़ीत विविध निर्णय घेण्यात आले. यावेळी मराठवाड्यातला दुष्काळ (Drought) हटविण्याचा, पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहुन जाणारे 22.9 अ. घ. फुट पाणी गोदावरी खोऱ्यात (Godavari Valley) वळविण्याचा निर्णय या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 14 हजार 40 कोटींची योजना राबविण्यात येणार आहे.
महत्त्वाची बातमी : राज्यात 141.09 लाख हेक्टरवर खरीप पेरण्या
शिवाय पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार असून त्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा बांधण्यात येणार असून, त्यामुळे 1793 हे क्षेत्र सिंचित होणार आहे. त्यासाठी 285 कोटी 64 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
मराठवड्यात दुधाची क्रांती (Milk Revolution) घडविण्यासाठी सर्व जिल्ह्यातील 8600 गावांत दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी 3225 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तुळजापूर (tuljapur) तालुक्यात शेळी समुह (Goat Group) योजना राबविण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर देवणी (Devni) या गोवंशीय प्रजातीच्या उच्च दर्जाची वंशावळ निवड करण्यासाठी 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बीड (Beed) येथे सीताफळ (Sitafal) आणि इतर फळांवर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी 5 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. हळद संशोधनास आता वेग येणार असून, हिंगोलीतील हरिद्रा संशोधन केंद्रासाठी (Haridra Research Center) 100 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच अंबाजोगाई (Ambajogai) येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मुलामुलींचे वसतीगृह सुरु करण्यासाठी 105 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, अंतर्गत ठाणा ता. सोयगाव (Soygao) जि. छत्रपती संभाजीनगर येथे शासन अनुदानित कृषी महाविद्यालय (Agriculture College) स्थापन करण्यात या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
आवाहन : रासायनिक खतांचा वापर 20 टक्क्यांनी कमी करा : मांडवीया
https://www.facebook.com/shetimitramagazine03