महाराष्ट्रात येत्या ५ दिवसांसाठी जिल्हानिहाय तीव्र हवामानाचा इशारा हवामान खात्याने दिला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर विदर्भात दोनचार दिवसांत काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येता आठवडा हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.
आनंदाची बातमी : बियाणे महोत्सव ही ‘क्रांती’ची सुरुवात : बच्चू कडू
हवामान खात्याकडून आजही काही शहरांना पावासाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. कोकणातील अनेक जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांत सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यताही वर्तवली आहे.
महत्त्वाची बातमी : पीक कर्जावरील व्याज परतावा परत सुरू करा : मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी
दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ४५ पूर्णांक २ अंश सेल्सिअस झाली असून मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबई, पुण्यासह सांगली, सातारा, मराठवाडा, विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी सोसाट्याचा पाऊस झाला. हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.

पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्सून कोकणात
दरम्यान, केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो. मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान देशात या मान्सून हंगामात आधीच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केली आहे.
मोठी बातमी : शेतकऱ्यांना इतर नॅनो खतेही उपलब्ध होतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1