यंदाच्या खरीप हंगामात राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1 जून ते 17 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत राज्यातील 4 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा तब्बल 80 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.
अधिवेशन वार्ता : शेतकऱ्याने काय करावे ? कसे जगावे ? अजित पवारांनी उपस्थित केले सभागृहात सवाल
याबाबत हवामान विभागाने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्वाधिक पाऊस नोंदणीमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्याचा समावेश झाला आहे. दरवर्षी दुष्काळी विभाग म्हणून मराठवाड्याकडे पाहिले जाते. मात्र यंदा पावसाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार हजेरी लावली. या आठही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. या अतिरिक्त पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या पावसाने पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

राज्यातील 4 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, नाशिक आणि विदर्भातील नागपूर आणि वर्ध्याचा समावेश आहे. याच चारही जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुग, मका, कापूस आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका फळबागांनाही बसला आहे. शिवाय या चार जिल्ह्यात रहात्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझडही झाली आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 20 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असा एकाही जिल्हा यंदा नाही हे विशेष आहे.
महत्त्वाची बातमी : कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचा उद्या शेवटचा दिवस
जुलैमध्ये राज्यात सक्रिय झालेला पाऊस अद्यापही कायम असून, पिकाच्या नुकसानीचे आकडे वरचेवर वाढत आहेत. अशीच परस्थिती राहिली तर यंदा विक्रमी पावसाची नोंद होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल 15 लाखहून अधिक हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपयांची मदत जाहीर केली आहे. सध्या पंचनामे सुरु असून लवकरच मदतिची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
ब्रेकिंग : आठवड्याला कृषीमंत्री येणार शेतकऱ्यांच्या बांधावर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1