उन्हाळ पिकांच्या लागवडीत यंदा 7 टक्क्यांची वाढ झाली असून 22 एप्रिल अखेरीस देशभरात 64 लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच हंगामात देशभरातील 60 लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली होती.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा कडधान्य लागवड क्षेत्रात 53 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 14.18 लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. त्यातही मुगाच्या लागवड क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या उन्हाळ्यातील 6.93 लाख हेक्टर क्षेत्रातील मूग लागवडीच्या तुलनेत यंदा 10.47 लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड करण्यात आली आहे.
हे नक्की वाचा : ड्रोन फवारणीसाठी 477 कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी
उन्हाळ लागवडीस आणखी 15 दिवस बाकी असून, या काळात कडधान्य लागवडीचे प्रमाण वाढले तर त्याचा लाभ होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यंदा बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीची कापणी झाल्यानंतरच लगेच उन्हाळ पिकांची लागवड केली असल्याचे निरीक्षण कडधान्य प्रक्रिया उद्योग क्षेत्राकडून नोंदवण्यात आले आहे.
हे वाचा : रोजगार हमीसाठी गावपातळीवर स्वतंत्र यंत्रणा ?
उन्हाळ लागवडीत एकीकडे कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढलेले असताना भातपिकाच्या लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट पहायला मिळत आहे. यंदा 28.87 लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आली आहे, गेल्यावर्षी याच कालावधीत 30.61 लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आली होती.
महत्त्वाचे वृत्त : रायगड जिल्ह्यातील 26 हजार लोक पीएम किसानसाठी अपात्र
यंदा 10.61 लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 10.26 लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड करण्यात आली होती. तृणधान्य लागवडीचे क्षेत्रही यंदा 64 हजार हेक्टरने वाढले आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यातील 6.23 लाख हेक्टर क्षेत्रावरील मका लागवडीच्या तुलनेत यंदा 6.21 लाख हेक्टर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली आहे.
हेही वाचा : खारीपासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा वेळेत द्या : कृषीमंत्री दादाजी भुसे
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1