सागाची जलद वाढ होण्यासाठी

0
847

सागाला सूर्यप्रकाशाची नित्तांत गरज असते. त्यासाठी स्वतंत्र साग शेती करणे महत्त्वाचे आहे. सागाला चक्रीवादळाचा धोका असतो कारण कारण सागाची मुळे इतर झाडांप्रमाणे खोलवर जात नाहीत ती मध्यम खोलीपर्यंत जातात. तसेच सागाला दुष्काळ सहन होत नाही. त्यासाठी काही प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे सागाला पाणी व्यवस्थापनाची गरज भासते. साग शेतीला वणवा लागला तर त्यातूनही सागाचे झाड चांगले तग धरू शकते. त्याला मुळ झाडाच्या बुंध्यालगत जमिनीतून फुटवा फुटतो. अनेक कोंब येतात. काही वेळा वाळवाच्या पावसात गारपीट होण्याची शक्यता असते कदाचित मोठ्या गारा पाडल्यातर सागाच्या झाडाला मोठी इजा होते. तसेच हिमवर्षाचाही धोका सहन होत नाही. आपल्या महाराष्ट्रात हिमवर्षाचा प्रश्‍न येत नाही. सागाच्या शेतीमध्ये जनावराच्या घुसखोरीपासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कुंपणाची सोय करावी लागते. कारण जनावरे साग शेतीमध्येज धुसली की फार नुकसान करतात. तसेच जंगली प्राणी ही या वृक्षाचे नुकसान करतात त्यामध्ये डुक्कर, हरणे, बिबळे, हत्तींचा उपद्रव झाल्यास सागाचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर उंदीरही कोवळ्या झाडाची मोठी हानी करतात काही किटकांचाही हल्ला सागाच्या वृक्षावर होतो त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधाची फवारणी करावी. मोठ्या क्षेत्रावर हपालिया मकेरालिस व ही बलीया पेऊरा नावाच्या अळ्यांचा हल्ला होऊन झाडाचे मोठे नुकसान होते. या झाडावर काही बांडगुळ वाढतात. त्यामध्ये लॉजिक्लोरा व लोरॅथस या जातीची बांडुगळे वाढतात तर वेळीच ही बांडगुळे नष्ट करून टाकावीत. अशा तर्‍हेने सागाच्या शेतीची दक्षता घेतल्यास साग शेती चांगली विकसीत होते शिवाय यातून चांगले उत्पन्न मिळेल परंतु यासाठी काही कालावधी आणि जास्तीचा वेळ द्यावा लागेल. 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here