बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या चार दिवसात पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. आज आणि उद्या विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन ते चार दिवसांपासून मॉन्सूनचा कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग काहीसा उत्तरेकडे सरकला आहे. तर पूर्व भाग सर्वसाधऱण स्थितीवर आहे. उत्तर बंगलाच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावर आहे. दोन दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारकडे सरकत आहे. अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून, बिहार, मध्य प्रदेशसह उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच विदर्भ, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. उद्या रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणीच मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असला तरी रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. चार दिवसांनंतर ऑगस्टच्या सुरुवातीला या पाचही जिल्ह्यांमधील पाऊस कमी होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा