पपईवर फार थोडे किडे आक्रमण करतात. कारण पपईच्या सर्व भागात जे दूध आढळते त्यामुळे किड्यांपासून पिकाचे संरक्षण होते. फळाच्या आतील मऊ खाद्यापर्यंत पोहोचू शकेल इतक्या खोलवर अंडी घालणे अवघड जाते, म्हणून ही फळे बहुधा माशीच्या उपद्रवापासून मुक्त असतात. गुणवत्ता आणि अधिक उत्पादनासाठी पपईवरील किडींचे नियंत्रण करणे महत्त्वाचे असते.
1) पांढरी माशी : ही कीड पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने खालच्या बाजूने आकुंचन पावतात. पाने पिवळी पडतात त्यामुळे ती आकसल्यासारखी दिसतात व खाली जमिनीच्या बाजूस दुमडलेली आढळतात.
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस किंवा डायमिथोएट यासारख्या आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. या किडीमुळे विषाणूंचा प्रसार होतो. किंवा नयंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस फवारावे. तसेच विषाणूग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
2) लालकोळी : ही कीड पानाच्या खालच्या बाजूने रस शोषते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. फळे पिकताना पिवळी धमक न होता फिकट हिरीव-पिवळी राहतात.
नियंत्रण : याच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त पाने नष्ट करावीत. पाण्यात विरघळणारे गंधक एक लिटरला तीन ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारावे. अथवा 0.06 टक्के डायमेथॉट किंवा 0.04 टक्के डायकोफॉल तीव्रतेचा फवारा द्यावा.
3) पाने गुंडाळणारी अळी : या किडीच्या नियंत्रणासाठी मिथेल डिमेटॉन 25 ईसी किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्ल्यूएससी एक लिटर पाण्यात एक मिली या प्रमाणात दर 20 ते 25 दिवसांनी फवारावे.
4) सूत्रकृमी (निमॅटोड) : पपई झाडाच्या मुळावर गाठी करणार्या सूत्रकृमी आणि रेनिफॉर्म सुरूवातीला ठिपक्यांचा आकार एक मिली असतो. नंतर तो चार ते आठ मिमी होतो. फळाची वाढ होत नाही व ती वाकडी होतात. तेलकट ठिपके पानाच्या देठावर व खोडाच्या कोवळ्या भागावर दिसतात. या विषाणू रोगाची बाधा काकडी वर्गातील पिकांना होते. त्यापासून रोगाचा प्रसार पपईच्या झाडावर होतो. पपई झाडाच्या मुळांवर सूत्रकृमी गाठी करतात. त्यामुळे झाडांची वाढ कमी होते व उत्पादन कमी होते.
नियंत्रण : याच्या नियंत्रणासाठी सूत्रकृमी असलेल्या जमिनीत पपई लावू नये. बागेत झेंडूची रोपे लावावीत.
5) तुडतुडे : पाने, फुले व कोवळ्या शेंड्यातील रस शोषणार्या व खरवडणार्या किडीमुळे कोवळ्या पानावर हिरवे, पिवळे चट्टे पडतात. पाने ओढल्यासारखी दिसतात किंवा गोळा होतात. कोवळी फुले रस शोषल्यामुळे गळून पडतात. ही कीड कापूस, वांगी, भोपळा, काकडी इत्यादी पिकांवर आढळते. या किडीमुळे विषाणू रोगाचा पपईच्या झाडावर प्रसार होतो.
नियंत्रण : पपईची लागवड करतेवेळेस 10 ते 20 ग्रॅम निमपेंड खड्ड्यात टाकावे. किडीच्या नियंत्रणासाठी 500 लिटर पाण्यात 775 मिली क्लोरोपायरीफॉस मिसळून झाडाच्या खालच्या बाजूने शेंड्यापर्यंत फवारावे. शेतातील व बांधावरील तणांचे नियंत्रण करावे. ही कीड पानांच्या खालच्या बाजूस जमावाने आढळते. पानातील रस शोषून घेते. पाने पिवळी पडतात. कधी कधी फळाच्या पृष्ठभागावर ही कीड आढळते. त्यामुळे फळाची साल खडबडीत व तपकिरी रंगाची दिसते. उपाय म्हणून पाण्यात मिसळणारे 1825 ग्रॅम गंधक 500 लिटर पाण्यातून फवारावे.
6) मावा : या कीटकामुळे विषाणू रोगाचा प्रसार होतो. कलिंगड, चवळी, बटाटा या पिकांवरील मावा कीटक विषाणू रोगाचा प्रसार पपईवर करतात.
नियंत्रण : रोग बरा करण्याचा उपाय सध्या अस्तित्त्वात नाही. निवारणासाठी रोगट झाडे दिसताच त्वरित उपटून काढून बाग स्वच्छ ठेवावी. पपईच्या बागेत काकडीच्या वेली लावू नयेत व जवळपास लागवड करू नये. तसेच रोगग्रस्त बागेजवळ नवीन रोपे तयार करू नयेत. समतोल खताचा व सुक्ष्म अन्नद्रव्याचा भरपूर वापर करून सुरूवातीपासूनच झाडे जोमदार ठेवल्यास बर्याच प्रमाणात रोगनियंत्रण होते. तसेच क्लोरोपायरीफॉस 375 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शिवाजी बोडके ‘गरुड झेप’, वडवळ स्टॉप, मोहोळ-सोलापूर रोड (एनएच-65), मोहोळ, जि. सोलापूर (महाराष्ट्र), मोबा. 9881325555, 9422646425.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास हा लेख आवडला असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा