कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा: राज्यपाल कोश्यारी

0
673

कृषी क्षेत्रातील पदवीधरकांनी नोकरीच्या मागे न लागत कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 39 व्या पदवीदान समारंभात ते ऑनलाईन पद्धतीने बोलत होते. यावेळी त्याच्या समवेत कृषी मंत्री दादा भुसे यांनीही ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली.

दापोली येथे कुलगुरु संजय सावंत, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभात आज पदव्युत्तर पदवीच्या 132, पीएचडीच्या 30 आणि पदपीपूर्व अभ्यासक्रमाच्या 1925 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यावेळी गोल्ड मेडेलिस्ट आणि पीएचडी घेणारे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर होते. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं पदवी बहाल करण्यात आली.

याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने बोलताना राज्यपाल कोश्यरी म्हणाले, प्राचीन काळी भारत हा कृषीप्रधान देश होता. देशात दुध-दह्याच्या नद्या वाहत होत्या. कृषी व कृषीवर आधारित उद्योग, फलोत्पादन यांमुळे देश संपन्न होता. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले परंतु त्यानंतर हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात सफेत क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अशावेळी कृषी क्षेत्रातील पदवीधारकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे देखील शेतीचे पारंपारिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्र-कुलपती दादाजी भुसे यांनी संबोधन केले तर कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी दीक्षांत भाषण दिले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here