राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्यात मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई व उर्वरीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाड्यासह काही जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शतकर्यांची मागणी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्यांना विमा कंपनीने तक्रार करण्यासाठी चार पर्याय दिले असून, तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी, कागदपत्रांची पूर्तता करून व पहाणी करून कंपनीकडे अहवाला सादर करणार आहेत. त्यानंतर नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळणार आहे.
चक्रीवादळ किंवा अतिवृष्टीमुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास तक्रार करण्यासाठी रिलायन्स जनरल विमा कंपनी लि. कंपनीने टोल फ्री क्रमांकावर फोन करणे, इ-मेल करणे, क्रॉप इन्शुरन्स ऍपचा वापर करणे किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपाची तक्रार करणे असे चार पर्याय दिले आहेत. विशेष म्हणजे नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आता तक्रार करावी लागणार असून, तसे न केल्यास तक्रार मान्य होणार नाही. त्यामुळे नुकसानीचा दिनांक अचूक टाकावा लागणार आहे. तसेच लेखी तक्रार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कंपनीचे कार्यालया सुरू करण्यात आले आहे.
1) टोल फ्री नंबर : 1800 202 4088 पाहिल्यावेळेत फोन लागत नाही, पुन्हा पुन्हा फोन करावा. फोन लागल्यानंतर भाषा निवडावी आणि विचारलेली माहिती सांगावी.
2) ई-मेल ID : [email protected] या ई-मेल आयडीवर नुकसानीची माहिती द्यावी.
3) ऍप वरून तक्रार करण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
ऍप वापरून तक्रार देतांना विमा पावती नंबर टाकणे आवश्यक आहे. तक्रार नोंद झाल्यानंतर मोबाईल वर येणाऱ्या डॉकेट आय डी चा स्क्रीन शॉट आवर्जून काढून ठेवा. या आय डी वरून आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती पाहिजे तेंव्हा मोबाईल वर लगेच कळते. त्यामुळे ऍप चा वापर करून तक्रार करणे केंव्हाही फायदेशीर आहे. तसेच ऍप चा वापर करणे सोपे आहे. नुकसानीचे कारण नोंदवताना cyclone rain (चक्रीवादळ) किंवा excess rainfall (अती पाऊस) यापैकी जे असेल ते नोंदवावे किंवा लिहावे. जर सोयाबीन पाण्यात उभे असेल तर standing crop असे नोंदवावे किंवा लिहावे. वर्ष 2021-22 असे नोंदवावे किंवा लिहावे.
हेही वाचा :
सोयाबीन लागवडीचे व्यवस्थापन तंत्रज्ञान
सोयाबीनवरील किडींचे असे करा एकात्मिक नियंत्रण
कपसावरील गुलाबी बोंडअळीचे असे करा एकात्मिक नियंत्रण !
कापूस पिकावरील मावा व तुडतुड्याचे एकात्मीक नियंत्रण
4) लेखी तक्रार : जर वरील तिन्ही पर्याय व्यवस्थित चालू नसतील तर, तालुका स्तरावर असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात खालील कागदपत्रे सादर करावे. त्यामध्ये 1) विहित नमुन्यातील पीक नुकसान पूर्वसूचना अर्ज, 2) विमा पावती, 3) विमा पावतीवर नोंदवल्या नुसार 7/12 व 8-अ, 4) आधार कार्ड xerox, व 5) बँक पासबुक Xerox ही कागदपत्रे जोडुन पीक नुकसान तक्रार देऊन पोहोच आवर्जून घ्यावी.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा