शेतीमधील वाढत्या मजूर समस्येचा सर्वात मोठा फटका कापूस शेतील बसत आहे. एकाच वेळी कापूस वेचणीची वेळ येत असल्याने ही समस्या वरचेवर भेडसावत आहे. ही कापूस उत्पादक शेतकर्यांची समस्या आता कापूस वेचणी मशीनमुळे दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कापूस वेचणी ही एकाच वेळी येत असल्याने कापूस उत्पादक शेतकर्यांना मजूरांची मोठी समस्या भेडसावते. दूर करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या संशोधनाला चांगलेच यश मिळाले असून, एआयटीजी या कंपनीने कापूस वेचणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या सहाय्याने एका तासात बारा किलो याप्रमाणे आठ तासात एक क्विंटल कापूस एक व्यक्ती वेचू शकते. त्यामुळे कापूस वेाशयाची शेतकर्यांची समस्या यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे.
सध्या शेतीपुढे सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे मजुरांची. मजूर वेळेवर न मिळाल्याने बरेचसे शेतीची कामे रखडत जातात. पर्यायाने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही समस्या प्रत्येक पिकांच्या बाबतीत आहे. कापूस पिकामध्ये तर ही समस्या तीव्रतेने जाणवते.
कापूस वेचणी ही एकाच वेळी येत असल्याने मजुरांची टंचाई ही प्रकर्षाने जाणवते. या समस्येवर उपाय म्हणून गेल्या पाच वर्षापासून केलेल्या संशोधनातून हे एआयटीजी कंपनीने कापूस वेचणी चे यंत्र तयार केले आहे. या मशिनच्या साह्याने एका तासात बारा किलो याप्रमाणे आठ तासात एक क्विंटल कापूस एक जण वेचू शकतो. त्यामुळे कापूस वेचण्याची शेतकऱ्यांची समस्या यामधून दूर होण्यास मदत होणार आहे.
कपाशी क्षेत्राचा विचार केला तर मजूर टंचाईच्या समस्येने दरवर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होत आहे.एकट्या मराठवाड्याचा विचार केला तर पाच वर्षांपूर्वी कपाशी लागवडीखालील क्षेत्र हे 17 लाख हेक्टर होते. यावर्षी अवघ्या साडेबारा लाख हेक्टरवर कपाशीची लागवड आहे.यामागे प्रमुख कारण म्हणजे वाचण्यासाठी मजुरीचे वाढलेले दर आणि वेळेत वेचणीला मजूर मिळत नसल्यामुळे क्षेत्र कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा :
कापसावरील गुलाबी बोंडअळीचे असे करा एकात्मिक नियंत्रण !
कापूस पिकावरील मावा व तुडतुड्याचे एकात्मीक नियंत्रण
जाणून घ्या उसाच्या तूऱ्याचे महत्व
असे करा आडसाली उसाचे खत व्यवस्थापन
कमी का येते ? सुरू उसाचे उत्पादन !
या मशीनच्या मागच्या बाजूला म्हणजे पाठीमागे एक मोठी बॅग लावलेली आहे. तसेच दोन प्लास्टिकच्या दाते बसवण्यात आले आहेत. हे यंत्र नुसते कपाशीच्या बोंडा जवळ नेले असता एक कापूस ओढून मागे लावलेल्या पिशवी मध्ये ऑटोमॅटिक टाकते.
हे वजनाने हलके असल्यामुळे सहजतेने हाताळता येते.त्याला एक वरच्या बाजूला बटण असून ते बटन चालू केले असता मशीन बोंडा जवळ नेले असता कापूस आत मध्येखेचलाजातो. या मशीन चे वैशिष्ट्य म्हणजे या मशीनच्या सहाय्याने कापूस वेचणी केले असता कापसामध्ये कुठल्याही प्रकारचा काडीकचरा अथवा घाणखेचली जात नाही. कापूस हा स्वच्छ आणि दर्जेदार येतो.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा