कांद्याच्या साठवणूकीसाठी टाटाचे स्मार्ट वेअरहाऊस लॉन्च

0
837

कांदा साठवणूक शक्य नसल्याने एकाच वेळी कांदा बाजारात येतो आणि कांद्याचा भाव पडतो. हे नेहमीच आहे. यावर कांदा साठवणूकीचा चांगलाच पर्याय पुढे आला आहे. टाटा स्टील कंपनीने कांदा साठवणूकीसाठी स्मार्ट वेअरहाऊस नुकतेच लॉन्च केले आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादकांकडून साठवणुकीच्या काळात होणारे कांद्याचे नुकसान टाळता येणार असून, कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी हे स्मार्ट वेअरहाऊस नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, अंदाजे १.००  लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते.  महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर सातारा जिल्हा कांदा पिकवण्याबाबत प्रसिद्ध आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा उत्पादित केला जातो. पण बऱ्याच शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी योग्य यंत्रणा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कांदा दरामुळे रडवत असतो. पण टाटा स्टील कंपनी अशा शेतकऱ्यांचे दुख दूर करणार आहे.  टाटा स्टीलच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सॉल्यूशंस ब्रांड नेस्ट – इनने देशातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक क्रांतिकारी सॉल्यूशन एग्रोनेस्ट लॉन्च केले आहे.

यामुळे बऱ्य़ाच प्रमाणात कांदा व्यवस्थित ठेवता येणार आहे. कांद्यासाठी बनविण्यात आलेले हे पहिले स्मार्ट वेअरहाऊस आहे. यात विज्ञान, नवीन अद्यावत इनोवेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. साठवणूक करण्याची पद्धतीत कमरतता आणि निकृष्ट पद्धतीचे आरखड्यासाठी वापण्यात आलेलेल साहित्य यामुळे जवळजवळ शेतकऱ्यांचा ४० टक्के कांदा गोदामात खराब होत असतो.

हवमानात झालेला अचानक बदल आणि वाहतूक आणि दळवळणातील आव्हाने यामुळे शेतकऱ्यांना आपला माल सुरक्षित ठेवण्यात अनेक अडचणी येत असतात. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची योग्य सोय नसते.  शेतकऱ्यांचा ही समस्या लक्षात घेत टाटा स्टीलच्या नेस्ट -इन आणि इनोव्हेट टीमने एक स्मार्ट वेअरहाऊस म्हणजे गोदाम सॉल्यूशन एग्रोनेस्ट विकसित केले आहे. याची रचना खुप आकर्षक आहे, अधिक प्रमाणात हवेची स्थिती नियंत्रित ठेवते. यात काही जागा असून कांदे अधिक काळासाठी सुरक्षित राहू शकतात.

हेही वाचा :

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसाठी काय ?

‘त्या’ निर्णयाविरुद्ध राज्यभर आंदोलन करू : रघुनाथदादा पाटील

जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित

खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करा : कृषिमंत्री दादाजी भुसे

का होत आहे कांद्याच्या दराची घसरण ?

हे गोदाम फार कमी प्रमाणात शेतमालाचे नुकसान होत असते. तापमान, ओलावा आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी  सेंसर लावण्यात आले आहे. जे माल खराब होण्याआधी आपल्याला सुचित करत असतात. टाटा स्टीलचे प्रमुख (सर्व्हिसेस एंड सॉल्यूशस) पी आनंद म्हणतात की, भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भता आणणे गरजेचे आहे. या गोष्टीने प्रेरित होऊन आमची एक्सपर्ट एग्रीकल्चर सेक्टरसाठी कस्टमासाइज्ड सॉल्सूशंस विकसीत केले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

Click to rate this post!
[Total: 2 Average: 4.5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here