जनावरांचा विम्याचा निधी, राष्ट्रीय पशुधन मिशनमध्ये राज्याचे येणारे प्रस्तावास मंजुरी आणि परदेशी संकरीत गायी आणि बक-यांना आयातीबाबात परवानगी मिळावी अश्या पशुसंवर्धनविषयी आज महत्वाची बैठक केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला आणि महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यात पार पाडली.
श्री केदार यांनी आज केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांची कृषी भवन येथे भेट घेतली. बैठकीत राज्याशी निगडीत पशुसंवर्धन विषयावर सविस्तर चर्चा झाली. राज्यातील जनावरांच्या विमासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आलेला आहे. केंद्राकडून या प्रस्तावास मंजुरी मिळावी तसेच याबाबतचा निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून मिळावा, अशी मागणी श्री केदार यांनी यावेळी केली.
यासह राष्ट्र पशुधन मिशनमध्ये विविध जाती विकसित करण्याबाबत प्रस्तावास मंजुरी तसेच या मिशनअंतर्गंत मिळणारा निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पशुच्या विविध जातीचे संकर विकसित करण्यास गती येईल, असेही श्री केदार यांनी सांगितले.
भारतीय गीर जातीच्या गायीवर ब्राझीलमध्ये संशोधन होऊन अधीक दुधाळ संकर तयार झालेले आहे. ही नवीन संकरीत गीर गाय दिवसाला 25-27 लीटर दूध देते. या गीर जातीच्या गायी भारतात आणुन शेतक-यांना द्याव्यात जेणे करून शेतक-यांच्या जोडधंधा म्हणुन असणा-या दुग्ध व्यवसायाला भरभराट येईल. तसेच यासोबतच सानेन या जातीच्या बक-या ज्या दिवसाला 10-12 लीटर दूध देतात. या बक-या महाराष्ट्रात आणण्याची परवानगी मिळावी, जेणे करून बक-यांच्या दुधातून रोजगार वाढीसाठी मदत होईल, अशी मागणीही श्री केदार यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली. या बकरीचे संकर नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनेडा, इजराईल येथे मोठया प्रमाणात आहेत पशुंच्या आयातीसंदर्भात परराष्ट्रीय व्यवहार मंत्रालयाकडून काही परवानग्यांची आवश्यक असते, त्या मिळण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी श्री केदार यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा