शेती उत्पादने व त्यापासून अनेक मूल्यवर्धित पदार्थ तयार करणाऱ्या उद्योगांना बर्याच प्रकारचे प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी शासनाकडून देखील बऱ्याच प्रकारची मदत केली जात आहे.
ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती तसेच ऊसापासून देखील इथेनॉल तयार केले जाते. परंतु आता चक्क बांबूपासून इथेनॉल तयार केले जाणार आहे. यासाठी बांबू पासून इथेनॉल रिफायनरी निर्मिती प्रकल्प लवकरच लातूर येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मांजरा नदीपात्रातील असलेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी असे आव्हान लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अर्थकारणाला गती मिळावी यासाठी जिल्ह्यात पाच हजार एकरावर बांबूची लागवड करावी.
येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर बांबूपासून इथेनॉल निर्मिती करण्याची रिफायनरी सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याबाबत एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. त्यावेळी त्यांनी बांबूला मार्केटिंग मिळवून देण्याची देखील घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी लातूर मध्ये सहकारी तत्त्वावर बांबू पासून तयार होणाऱ्या इथेनॉलची रिफायनरी उभी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील सांगितले होते.
लातूर जिल्ह्यातील अल्मेक बायोटेकलॅबच्या दुसऱ्या टप्प्यातील लॅबचा उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री देशमुख म्हणाले की, लातूर जिल्हा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्या काळी सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभे राहण्यासाठी चालना दिली व आता या घडीला लातूर सोयाबीनचे हब म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे सहकारी तत्त्वावर बांबू पासून तयार होणाऱ्या इथेनॉल रिफायनरी साठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा