यंदा हवामानातील बदलांमुळे मोठ्या प्रमाणात पीक पद्धतीमध्ये बदल झाला असून, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी ज्वारीला बाजूला सारून शेतकऱ्यांनी राजमा या नव्या पर्यायी पिकाची मोठ्या प्रमाणात यशस्वी लागवड केली आहे. दरम्यान मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा तालुक्यातही यंदा राजमा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांचा कल अधिकच्या उत्पन्नाकडेच राहिलेला आहे. खरिपात झालेले नुकसान, रब्बी हंगामाच्या सुरवातील अवकाळीचा फटका असे असतानाही पीक पध्दतीमध्ये सर्वाधिक बदल यंदा झाला आहे. विशेषत: मराठवाड्यात पारंपरिक शेतीलाच महत्व दिले जाते त्या भागातील 8 जिल्ह्यामध्ये मुख्य पीक असलेल्या ज्वारी पिकाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी राजम्याचा पर्याय निवडलेला आहे. राजमा हे उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे पीक आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात घेवडा म्हणून हे परिचित आहे. आता मराठवाड्यातही या रब्बी हंगामापासून याचे क्षेत्र वाढले आहे. एकरात 25 किलो बियाणे आणि सरासरी 8 क्विंटलचे उत्पादन शिवाय बाजारपेठेत मागणी असल्याने शेतकरी या पिकाकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून राजम्याची ओळख होत आहे.

दरवर्षी रब्बी हंगामात पाण्याची टंचाई असते. यंदा मात्र, सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असून त्याचा उपयोग आता रब्बी हंगामातील पिकांसाठी होत आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे क्षेत्रही वाढले असून पिकांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा राजम्याचे क्षेत्र वाढलेले आहे. खरिपात झालेले नुकसान या पीक पध्दतीमध्ये झालेल्या बदलातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे तो उद्देश आता साध्य होताना दिसत आहे. सध्याचे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक आहे. राजमा या पिकाचा नवा पर्याय असला तरी याकरिता एकरी 25 किलो बियाणे लागले आहे. त्यानुसार एकरी 8 क्विटल उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शिवाय बाजारपेठेत राजमा ला प्रति क्विंटल 6 हजराचा दर आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांमधून जे उत्पन्न घटत होते ते भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा नवा प्रयोग केला आहे. गतवर्षी केवळ हा प्रयोग होता पण उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात असल्याचे भूम येथील शेतकरी भाऊराव गायकवाड यांनी सांगितले आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
राज्यात नर्सरी हब सुरू करणार : कृषीमंत्र दादाजी भुसे
शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन
हवामान बदलामुळे राज्यातील 2 लाख हेक्टर फळबागा धोक्यात
बारामतीत चक्क मिरचीसाठी होमिओपॅथी औषधाचा वापर
सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड
उन्हाळी हंगामात सोयाबीनचाही पेरा वाढला आहे याला पर्याय म्हणून राजमा पिकाचेही उत्पादनही शेतकऱ्यांनी घेतल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. हे जोखीमाचे पीक असले तरी यातून उत्पन्न अधिकचे मिळते म्हणून शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. हंगामाच्या सुरवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला असला तरी पिके बहरात आहेत. शिवाय सध्या राजम्याला प्रति क्विंटल 9 हजाराचा दर आहे. भविष्यात आवक वाढली तरी 7 हजार रुपये दर कायम राहिल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा