उस उत्पादक शेतकऱ्यांना ठरलेल्या वेळेत संपूर्ण रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) न देणार्या राज्यातील 28 साखर कारखान्याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली आहे. 30 जानेवारीअखेर निम्मी एफआरपी थकविणार्या या कारखान्यांना आता लाल यादीत टाकण्यात आले आहे.
राज्यातील 197 साखर कारखान्यांनी 8 फेब्रुवारीपर्यंत 788 लाख टन ऊसाची खरेदी केली आहे. सर्वाधिक ऊस खरेदी कोल्हापूर (186.67 लाख टन), सोलापूर (187.07 लाख टन) विभागात करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पुणे (159.24 लाख टन) व नगर (105.24 लाख टन) विभागात ऊसाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून कारखान्यांनी ऊसखरेदी केल्यापासून 14 दिवसांच्या आता एफआरपी चुकती करावी असे कायद्यात आहे. मात्र या नियमांचे उल्लघन करणार्या 28 साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या लाल यादीमध्ये समाविष्ठ केले आहे. या 28 कारखान्यांनी केवळ 0 ते 59.99 टक्के एफआरपी दिली आहे. त्यामुळेच त्यांना लाल यादीत टाकले आहे.
लाल यादीत टाकलेलेल्या कारखान्याच्या यादीत त्रिधारा, टोकाई, बी.बी.तनपुरे, बळिराजा, ग्रीन पॉवर, लोकमंगल, कुकडी, जयहिंद, नीरा-भीमा, विखे पाटील, एमव्हीके अॅग्रो, सिद्धनाथ, गणेश, मकाई, संत एकनाथ, कर्मयोगी, शिवरत्न, भैरवनाथ युनिट 3, कुंटुरकर व भैरवनाथ युनिट 2 हे कारखाने आहेत. तर अर्धवट एफआरपी देणार्या कारखान्यांचे आणखी दोन गट करण्यात आले आहेत. त्यानुसार 60 ते 79.99 टक्के एफआरपी दिलेल्या कारखाने नारंगी यादीत टाकले आहेत. आतापर्यंत असे 33 साखर कारखाने यादीत टाकले गेले आहेत. तर 80 ते 99.99 टक्के एफआरपी देणाऱ्या 47 साखर कारखान्यांन्या पिवळ्या यादीत टाकण्यात आले आहे. 100 टक्के एफआरपी देणाऱ्या 83 साखर कारखान्यांना हिरव्या यादीत टाकले आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
शिलकी ऊसाची जबाबदारी कारखान्यावर !
आता केवळ 90 सेकंदात माती परीक्षण
पीक पद्धतीत मोठा बदल; मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात राजमा
शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन
बारामतीत चक्क मिरचीसाठी होमिओपॅथी औषधाचा वापर
सातबारा उतारा होणार बंद; मिळणार प्रॉपर्टी कार्ड
शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी न दिल्यास 15 टक्के विलंब व्याजही द्यावे लागते. मात्र या नियमाची अंमलबजावणी करीत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलेला आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा