शिरोळ (कोल्हापूर) येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यांने परिसरातील महापुराने खचलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सभासद शेतकऱ्यांना शुगर बीटची लागवड करायला लावून आता कारखान्यात गाळप सुरू केले आहे.
यासंदर्भात कारखान्याने गेल्या चार महिन्यापूर्वी तातडीने शुगर बीटची लागवड करण्याचा निर्णय घेतला. लागलीच ऑक्टोबरमध्ये सभासद शेतकऱ्यांची बैठक घेवून त्याना शुगर बीट लावण्याचे आवाहन केले. त्यानुसार सुमारे 50 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर शुगर बीटची लागवड करण्यात आली. सध्या या बीटची काढणी सुरू असून त्याचे कारखान्यात गाळप करण्यात येत आहे. बीट काढणी काढलेल्या प्लॉटमध्ये काही चुका झाल्या आहेत का? किंवा शेतकर्यांना काही अडचणी आल्या आहेत. यासंदर्भात सध्या कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील स्वत: प्रयत्न करीत आहेत. त्यांनी यासाठी देशातील तज्ज्ञांशी संपर्क साधून चांगल्या प्रतीचे बियाणे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. तसेच त्यांनी राज्यातील विविध ज्येष्ठ ऊस तज्ज्ञांच्या मदतीचे तसेच देशातील विविध संस्थांच्या सहकार्याने शुगर बीटचे बियाणे व मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासाठी त्यांनी नुकतेच अशा तज्ज्ञांना एकत्र करून शुगर बीट या विषयावर चर्चा घडवून आणली. शुगर बीटच बियाणे तयार करणार्या देशभारतील कंपन्या, शुगर बीटवर काम करणाऱ्या संस्था, शुगर बीट विषयातील तज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधून लवकरच मोठ्या प्रमाणात शुगर बीटची लागवड करण्याचा विचार सुरू आहे. तसेच बियाणे पुरवणार्या कंपन्यांशी थेट संपर्क साधून दर्जा बाबतचा करारही कारखान्यामार्फत करण्यात येणार आहे.
यासाठी कारखान्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. अरुण देशमुख, डॉ. पी. व्ही. घोडके, डॉ. बी. पी. पाटील, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. मोहन डोंगरे आदीच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत दिवसभर ऊस व्यवस्थापना बरोबरच शुगर बीट लागवडीबाबत गांभीर्याने विचार करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या शुगर बीट प्लॉट मधील शुगर बीटचे वजन, शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी, वाढीतील अडथळे, रोग-किडीचा प्रादुर्भाव यावर प्राधान्याने चर्चा करण्यात आली. यासंदर्भात पुन्हा एक बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर शुगर बीट लागवडीची पुढील वाटचाल ठरविण्यात येणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेत झाली कमालीची वाढ
सेंद्रिय कर्बाच्या वाढीसाठी कोंबडी खताची जादू
जीआय मिळालेल्या फळामधील वाढत्या बनवेगिरीला आळा घालणार ?
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी बॉक्सवर क्यूआर कोड
लाल मिरचीचा ठसका दर 25 हजारावर
शुगर बीट विषयी : जगातील एकूण साखर उत्पादनापैकी सुमारे 30 टक्के उत्पादन शुगरबीट पासून केले जाते. अमेररिका, बेल्जियम, फ्रान्स, स्पेन व अन्य देशांमध्ये या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यापासून साखरेशिवाय इथेनॉल, हिरवा चारा, पल्प व चोथा मिळतो. याचा शिल्लक भाग कंपोस्ट खत म्हणून वापरता येतो.
शुगर बीट हे सध्याच्या बदलत्या हवामानात चांगले येणारे पीक असून ते कमी पर्जन्यमानाला अनुकूल आहे. अत्यंत कमी पाण्यात याचे एकरी 35 ते 40 टन उत्पादन येऊ शकते. इतर पिकाच्या तुलनेत याला किडी-रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे. यामध्ये सर्वसाधारण साखरेचे प्रमाण 12 ते 15 टक्के आहे. चोपण, क्षारपड जमिनीत शुगर बीट चांगले येऊ शकते. विशेषत: जमिनीतील क्षार व अन्य हानिकारक घटक शोषून घेऊन जमीन सुपीक बनवते.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇