महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे 18 ते 20 फेब्रुवारी या काळात तीन दिवसाच्या काळात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन आदीचे आयोजन करण्यात आले आहे.
जुन्नर मध्ये आयोजित द्राक्ष महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कलाकुसर करणारे कारागीर, बचतगट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.
यामध्ये विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. महोत्सवामुळे पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था असणार आहे.
पक्षी निरीक्षणाची संधी : जुन्नरमधील देवराईमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गीब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी समूह, ताम्हाणे संग्रहालय, लेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल. तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील बाजार पाहता येईल व खरेदी करता येईल. पर्यटक इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात. पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायिक समूदाय यांनी एकत्र येऊन द्राक्षाच्या बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्ट्या उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या, पुणे येथील उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अहवाल खुला कराव : कृषीमंत्र दादाजी भुसे
पोहरा येथे शेळी समूह योजनेसाठी 7.81 कोटी मंजूर; उर्वरीत 5 प्रकल्पांना मान्यता
कोल्हापूरातील द्राक्ष महोत्सवात पाच लाखाची विक्री
येणाऱ्यां हंगामासाठी खताचे अत्ताच नियोजन करा : कृषीमंत्री दादाजी भुसे
या महोत्सवात https://bit.ly/3tUCoQL या गूगल लिंकवर जाऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇