रब्बी हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे. अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवकही सुरू झाली आहे. मात्र बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बाजार भावाप्रमाणेच हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. केंद्र सरकारने हमीभावाचा महत्त्वाचा निर्णय घेतला मात्र हमीभाव खरेदी केंद्रे सुरू नसल्याने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांवर बाजार भावाने हरभारा विक्रीकरण्याची नामुश्की येत होती मात्र आता हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता शेतकऱ्यांचा हरभरा हमीभावाने विकला जाणार आहे.
रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरु झाली आहे. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 700 पर्यंत दर मिळाला आहे. मात्र, 5 हजार 250 रुपये क्विटंल हा हमीभावाचा दर असतानाही खरेदी केंद्र उभारली नसल्यामुळे खुल्या बाजारात शेतकऱ्यांना हरभरा विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्वरीत हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खुल्या बाजारपेठेत दर घसरले तरी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राचा पर्याय राहणार आहे.
हमीभावाने हरभरा विक्रीसाठी आवश्यक असलेली नोंदणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना 15 मार्च नोंदणी आणि त्यानंतर प्रत्यक्ष विक्री असे नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हरभरा विकण्यासाठी बाजार समिती परिसरात विक्रीसाठीची नोंदणी ही शेतकर्यांना करता येणार आहे. हरभऱ्यारी हमीभावाने विक्री करण्यासाठी आता शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी तालुका स्तरावरील तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. केंद्राच्या किमान हमीभावानुसार शेतीमाल खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबई, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, महाएफपीसी पुणे, पृथ्वाशक्ती फार्मर प्रड्युसर कंपनी, नगर आदींच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
नुकसान भरपाईची 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
महाराष्ट्रात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव 25 हजार कोंबड्या मारण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
केळीच्या दरात दीड वर्षातील विक्रमी वाढ
हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अहवाल खुला कराव : कृषीमंत्र दादाजी भुसे
कागदपत्रे जमा करण्यासाठी 1 महिन्याची मुदत हमीभाव केंद्रावर कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे एक महिन्याचा कालावधी असणार आहे. 16 फेब्रुवारीपासून याला सुरवात झाली आहे तर 15 मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रिया खुली राहणार आहे. शिवाय नोंदणीनुसारच पुन्हा शेतीमालाची खरेदी होणार आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून ही पध्दत सुरु करण्यात आली आहे. नोंदणी करण्याच्या सूचना सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇