मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर कृषी विभागाच्या नुकसानीच्या अहवालानंतर राज्य सरकारने आर्थिक मदतची घोषणाही केली. पहिल्या टप्प्यात मंजूर निधीपैकी 75 टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. आता राहिलेला २५ टक्के निधी देखील आता या शेतकऱ्यांना मिळणार असून, 773 कोटी रुपयांचा दुसऱ्या टप्प्यातील निधी मराठवाड्यासाठी देण्यात आला. बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मागच्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये मराठवाड्यामध्ये ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अक्षरशः संपूर्ण पिके मातीमोल झाली होती. शेतपिकेच नाहीतर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जवळजवळ मराठवाड्यातील 44 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा अधिक निधी देण्याचे जाहीर केले होते.
त्या अनुषंगाने जाहीर केलेल्या निधीपैकी दिवाळीच्या वेळेस 75 टक्के निधी म्हणजेच 2821 कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी वितरित केला होता. तर यामधून उरलेला 25 टक्के निधी म्हणजे 763 कोटी 75 लाख रुपयांचा बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मिळावा यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे राज्य सरकारला नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाने उर्वरित 25 टक्के म्हणजेच 773 कोटी 75 लाख 17 हजार रुपयांचा निधी नुकसानग्रस्त शेतकर्यांना वाटपासाठी दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
असे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण
येत्या दोन वर्षात 31 जिल्ह्यात उभारणार 14 हजार कांदाचाळी
खरेदी केंद्रे सुरू आता हरभऱ्याला मिळणार हमीभाव
महाराष्ट्रात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव 25 हजार कोंबड्या मारण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
केळीच्या दरात दीड वर्षातील विक्रमी वाढ
मागच्या वर्षी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. तर सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇