राज्यातील कांद्याचे वाढत चाललेले दर लक्षात घेता यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारेन बंफर स्टॉकचा पर्याय पुढे आणला आहे. त्यामुळे आता कांद्याचे दर स्थिर होतील. परिणामी शेतकर्यांना मिळणारे अधिकचे चार पैसे मिळणे शक्य होणार नाही. यामुळे आता ग्राहकांमध्ये समाधान तर शेतकर्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या विरोधात शेतकरी अक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. असे असताना आता मात्र हे दर कमी होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या आवकमध्ये वाढ होऊनही दर घटत नाहीत. बाजारपेठेत वाढत्या मागणीमुळे किरकोळ बाजारपेठेत कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र आता मोदी सरकारने मोठा निर्णय घेतले असल्याने दर कमी होण्याची शक्यता आहे.
ज्या राज्यांमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत कांदा दरात वाढ झाली आहे अशा राज्यांमध्ये आता कांद्याचा बंफर स्टॉक उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामुळे कांद्याचे दर हे नियंत्रणात राहणार आहेत. यामुळे याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे. यामध्ये लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजार समितीमध्येही कांद्याचा स्टॉक करण्यात येणार आहे.
याबाबत मंत्रलयाने निवेदनही काढले असून, यामध्ये राज्यांना साठवणुकी व्यतिरिक्त इतर ठिकाणी 21 रुपये किलो दराने कांद्याची ऑफर देण्यात आली आहे. बाजारात बफर स्टॉकची आवक झपाट्याने वाढत असल्याने कांदा दरात स्थिरता आल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला लक्ष केले आहे. यामुळे राज्यातील कांद्याचे दर कमी होणार आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
यंदा खरीप हंगामातील कांद्याची आवक ही उशिरा सुरु झाली होती. सध्या आवक ही स्थिर असून आता रब्बी हंगामातील कांदा बाजारपेठे दाखल होईपर्यंच स्थिरच राहणार आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत कांद्याचे अखिल भारतीय सरासरी भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होते. किंमत स्थिरीकरण निधीच्या बाजारपेठेत हस्तक्षेप केल्यामुळेच या वर्षामध्ये कांद्याचे दर स्थिर राहिल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
नुकसानभरपाईचा 773 कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी वितरित
असे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण
येत्या दोन वर्षात 31 जिल्ह्यात उभारणार 14 हजार कांदाचाळी
खरेदी केंद्रे सुरू आता हरभऱ्याला मिळणार हमीभाव
महाराष्ट्रात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव 25 हजार कोंबड्या मारण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
या माध्यमातून केंद्र सरकार कांद्याचे दर नियंत्रणात आणणार आहे. यावर्षी कांद्याचे क्षेत्र वाढूनही किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे वाढत आहेत. दिल्ली आणि चेन्नईमध्ये कांद्याला 37 रुपये किलो तर मुंबईमध्ये 39 रुपये व कोलकत्यामध्ये 43 रुपये किलो असा बाजार आहे. यामुळे आता हे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे. राज्यात याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇