अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे हळद उत्पादनात घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या हळदीचा सुरू झालेल्या हंगामात सुरूवातीपासूनच चढा दर मिळत आहे. त्यामध्ये राजापूरी हळदीला अधिकचा दर मिळत आहे. सध्या हळदीची मुख्य बाजारपेठ असलेल्या सांगलीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात अवक सुरू आहे.
राजापुरी हळदीचे अधिक उत्पादन हे सांगली जिल्ह्यातच आहे. मात्र, यंदा उत्पादनात घट झाल्याने हंगामाच्या सुरवातीपासूनच दर चढे राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. येथील बाजार समितीमध्ये राजापुरी आणि परपेठेची अशा दोन प्रकारची 8 ते 9 हजार पोत्यांची आवक सुरु झाली आहे. मात्र, चांगल्या प्रतीच्या हळदीला 9 हजार ते 10 हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. ही हंगामाची सुरवात असली तरी उत्पादनात किती घट झाली आहे. यावरच दर अवलंबून आहेत.
हळदीच्या दरात तेजी कायम राहणार : मागणीपेक्षा पेक्षा पुरवठा कमी असेल तर शेतीमालाचे दर वाढतातच हा बाजारपेठेचा नियमच आहे. त्यानुसार यंदा सर्व पिकांच्या बाबातीत असेच होताना दिसत आहे. आता हळदीच्या बाबतीमध्येही असेच होत आहे. मागणी आणि होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याने विक्रम मोडीत काढत यंदा हळदीला विक्रमी दर मिळत आहे.. हंगामाच्या सुरवातीलाच चांगला दर मिळालेला आहे. आता मार्च-एप्रिल दरम्यानच हळीदीचे उत्पादन किती आणि दर कसे राहतील याची समीकरणे व्यापारी जुळवतील. मात्र, हंगाम सुरु झाला असून चांगल्या प्रतिच्या हळदीला विक्रमी दर मिळत आहेत.
राजापुरी आणि परपेठेची हळद बाजारात : सांगली आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांमध्ये हळदीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथेही हळदीची मुख्य बाजारपेठ आहे. सध्या सांगली बाजार समितीमध्ये हळदीची आवक दिवसागणिस वाढत आहे. सध्या राजापुरी आणि परपेठ या दोन हळदीच्या प्रकाराची आवक होत आहे. दोन्ही प्रकारची हळद मिळून अशी 9 हजार पोत्यांची आवक होत आहे. मात्र, या दोन्ही हळदींच्या दरांमध्येदखील फरक आहे. राजापुरी हळदीला सरासरी 8 हजार रुपये दर आहे तर परपेठ हळदीला 7 हजारापर्य़ंतचा दर मिळत आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
एचटीबीटी कापूस उत्पादनाला मिळणार लवकरच परवानगी
या कारणामुळे ढासळणार कांद्याचे दर !
नुकसानभरपाईचा 773 कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी वितरित
असे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण
येत्या दोन वर्षात 31 जिल्ह्यात उभारणार 14 हजार कांदाचाळी
तीन महिने सुरु राहणार हंगाम : सांगली जिल्ह्यातील काही भागात हळद काढणीला सुरवात झाली आहे. यंदा पावसामुळे उत्पादनात घट झाली असून आता वाढीव दरातून का होईना भरपाई व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. तर फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात असते. या दरम्यानच उत्पादन घटूनही फायदा होणार का हे लक्षात येणार आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇