शेती विकासासाठी गेल्या सात वर्षांत बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत अशा अनेक नवीन प्रणाली उपलब्ध करून दिल्यामुळे कृषी क्षेत्राला खूप फायदा झाला असून, जुन्या यंत्रणा सुधारल्या आहेत. अवघ्या सहा वर्षांत कृषी अर्थसंकल्प अनेक पटींनी वाढला आहे, शेतकऱ्यांचे कृषी कर्जही सात वर्षांत अडीच पटीने वाढले आहे. कोरोनाच्या काळात ३ कोटींहून अधिक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) शी जोडले गेले आहेत, तसेच सूक्ष्म सिंचनामुळे छोट्या शेतकऱ्यांना मदत होत असल्याचे समाधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
नैसर्गिक शेती, हायटेक शेती, बाजरीचे महत्त्व, स्मार्ट शेती आणि खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्णता या विषयांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शेतीला आधुनिक आणि स्मार्ट बनविण्यासाठी सात मार्ग सूचविले.
शेतीच्या आधुनिकीकरणाचे सात मार्ग
१. गंगेच्या दोन्ही काठावर 5 किमीच्या परिघात नैसर्गिक शेती मिशन मोडवर करण्याचे लक्ष्य आहे. वनौषधी, औषधी वनस्पती आणि फळे, फुले यावरही भर दिला जात आहे.
२. शेती आणि फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल.
३. खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी आम्ही मिशन ऑईल पाम तसेच तेलबियांना जास्तीत जास्त बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. यावर भर देण्यात आला आहे.
४. पीएम गतिशक्ती योजनेद्वारे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी लॉजिस्टिकची नवीन प्रणाली तयार केली जाईल.
५. कृषी-कचरा व्यवस्थापन अधिक संघटित होईल. वेस्ट टू एनर्जी या उपायांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
६. देशातील दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांना नियमित बँकांप्रमाणे सुविधा मिळतील, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
७. कृषी संशोधन आणि शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रमातील कौशल्य विकास, मानव संसाधन विकास हे आजच्या आधुनिक काळानुसार बदलले जातील.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
विदर्भातील सफेद मुसळी, पानपिंपळीला मिळणार भौगोलिक मानांकन
एफआरपी निर्णयाविरुद्ध सदाभाऊ खोत यांचे 27 पासून आंदोलन
नाबार्डची शेतीसाठी 1 कोटी 43 हजार कोटीची तरतूद
देशातील कृषी क्षेत्रात किसान ड्रोनचा जास्तीत जास्त वापर करण्याचा उपक्रम हा याच बदलाचा एक भाग आहे. जेव्हा आम्ही कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देऊ तेव्हाच ड्रोन तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. प्रति ड्रॉप मोअर क्रॉपवर सरकारचा भर आहे आणि ही काळाची गरजही आहे. व्यापार जगतासाठीही यामध्ये भरपूर वाव आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
👇 शेतीमित्रचा online shetimitra हा टेलेग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇