सध्या सर्रास पैशाचे व्यवहार मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने होतात. ते जेवढे सोपे आहे तेवढेच धोक्याचेही आहे. असाच धोका खानापूर (सांगली) येथील चार द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. या चार शेतकऱ्यांची तब्बल 9 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेषत: द्राक्ष बागायतदारांनी यापुढे व्यापार्यांबरोबर द्राक्ष विक्रेचे व्यवहार करताना काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे.
सध्या सांगली, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे. येथेही द्राक्षाचे व्यवहार होताना अशाच प्रकारे मोबाईल ऑनलाईन प्रणालीचा वापर केला जात आहे. परंतु हे किती धोक्याचे आहे हे नुकतेच खानापूर येथील द्राक्ष बागायतदारांची झालेल्या फसवणुकीवरून दिसून येते. त्यामुळे असे व्यवहार करतान काही काळजी घेणे गरजेच झाले आहे.
खानापूरात कसा घडला प्रकार : खानापूर (सांगली) येथील चार शेतकऱ्यांची तब्बल 9 लाखाची फसवणूक झाली आहे. सदरील व्यापाऱ्याने 11 लाखाची द्राक्ष खरेदी करुन 2 लाख रुपये हे व्यवहार दरम्यानच दिले तर उर्वरीत रक्कम ही ऑनलाईद्वारे जमा करणार असल्याचे सांगितले. खानापूरातील दत्तात्रय तुकाराम शिंदे, संभाजी महादेव जाधव, नेताजी दगडू जाधव, जयदीप सुरेश जाधव या चार जणांना उंब्रज येथील विजय बाळासाहेब तांबवे व सुरज बंडगर यांनी फसवले आहे. त्यामुळे द्राक्ष व्यवहार करताना कोणती काळजी घेणे महत्वाचे महत्त्वाचे झाले आहे.
शेतकऱ्यांनो व्यवहार करताना ही घ्या काळजी : शेतीमालाच्या उत्पादकतेपेक्षा बाजारातील दराला अधिकचे महत्व आहे. येथील व्यवहारावरच शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत कामी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना तोंडी नाही तर लेखी व्यवहार करणे गरजेचे आहे. यामध्ये द्राक्ष मालाचा दर, वाण याचा उल्लेख होणे गरजेचे आहे. शिवाय व्यापाऱ्याचा प्रतिनीधी किंवा निर्यातदाराचा प्रतिनीधी यांचे नाव, आधारकार्ड, मोबाईल नंबर याची अचूक नोंद घ्यावी लागणार आहे.
अशी होते फसवणूक : द्राक्षाचे खरेदी करताना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन होईपर्यंत व्यवहार हे चोख केले जातात. त्यानंतर मात्र, द्राक्ष खरेदी करुन काही दिवसांनी पैसे देतो किंवा ऑनलाईनद्वारे पाठवितो असे सांगण्यात येते. मात्र, एकदा का माल खरेदी केला की व्यापारी शेतकऱ्यांकडे फिरकत नाहीत किंवा शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. नाशिक आणि सांगली जिल्ह्यामध्ये असे प्रकार दरवर्षी समोर येतात. यासंबंधी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही पुरव्याअभावी कोणतीच कारवाई ही झालेली नाही.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
आता संत्र्याच्या सालीने शिजवता येणार अन्न
काय आहे नव्या कृषी निर्यात धोरणात ?
या आहेत मत्स्य व्यवसायतील 11 संधी
गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी या बाबी लक्षात घ्या !
द्राक्ष उत्पादक संघाचे काय आहे आवाहन : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये द्राक्ष उत्पादक संघाने एक सौदे पावत्यांची छपाई केली आहे. शिवाय द्राक्ष उत्पादकापर्यंत ती पोहचवली आहे. मात्र, याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. या पावतीवर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, गट नंबर, आधार नंबर याचा उल्लेख आहे तर खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅक हाऊस पत्ता, पॅन नंबर, परवाना क्रमांक याची माहिती शेतकऱ्यांनी ठेवणे गरजेच आहे. तर सौद्याचे स्वरुपमध्ये द्राक्ष वाणाचे नाव, ठरलेला भाव प्रतिकिलो, द्राक्ष तोडणीची तारीख, गाडी नंबर, वजन, एकूण रक्कम आणि पेमेंट देण्याची तारीख याचा उल्लेख आहे. त्यामुळे अशा स्वरुपाची माहिती भरुनच व्यवहार करण्याचे आवाहन द्राक्ष उत्पादक संघाचे संचालक अॅड. रामनाथ शिंदे यांनी केले आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇