खरीप हंगामातील कांद्याची आवक वाढली तरी त्या कांद्याचे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले. मात्र आता उन्हाळी कांद्याची बाजारात एंन्ट्री होताच एका रात्रित कांद्याचे दर एका रात्रीतून घसरले. शनिवारच्या तुलनेत आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर 550 रुपयांनी घसले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबोरबरच व्यापारीही धास्तावले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. आवक वाढूनही दर स्थिर होते. यंदा खरीप हंगामातील कांदा उशिराने बाजारपेठेत दाखल झाला होता. असे असतानाही त्याचा दरावर परिणाम नव्हता तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत यंदा विक्रमी आवक होऊनही दर हे स्थिरच होते. मात्र, आता उन्हाळी हंगामातील कांद्याची एंन्ट्री बाजारपेठेत झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत अधिकची वाढ झाल्याने शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 रुपयांनी दर घसरले. त्यामुळे कांद्याला लहरीपणाचे पीक कशामुळे म्हणतात याचा प्रत्यय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आला.
यावेळे कांद्याने ग्राहकांच्या नाहीतर शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आणले आहे. देशांतर्गतच्या मुख्य बाजारपेठात लाल कांद्याची आवक वाढली आहे. तर नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाव वर झाला आहे.
कांद्याच्या दरात अशी झाली घसरण : शनिवारी 1 हजार 233 वाहनातून 17 हजार 826 क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत झाली. कमाल 2625 रुपये, किमान 651 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला होता तर आज सोमवारी 1 हजार 800 वाहनातून 32 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक झाली कमाल 2077 रुपये, किमान 900 रुपये तर सर्वसाधारण 1750 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
असा करा ट्रायकोडर्माचा वापर आणि पहा रिजर्ट !
कापसाची मोबाइल जिनिंग सुविधा आता बांधावरच
माती परिक्षण करताना ही काळजी नक्की घ्या !
आता उन्हाळी कांद्याची आवक : आतापर्यंत खरीप हंगामातील लाल कांद्याचीच आवक होती. शिवाय सरासरीप्रमाणेच आवक असल्याने गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर हे टिकून होते. लासलगावच नाही तर सोलापूर, अहमदनगर येथील बाजारपेठेत आवक वाढूनही दर कायम होते. यंदा उन्हाळी कांद्याचे क्षेत्र हे वाढलेले आहे. शिवाय सध्याच दर हे टिकून असल्याने छाटणी झाली की लागलीच विक्रीवर भर दिला जात आहे. त्यामुळे लाल कांद्याची सरासरीएवढी आवक होत असताना त्यामध्ये आता उन्हाळी कांद्याची भर पडल्याने अचानक 550 रुपयांनी दर घसरले आहेत.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇