गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा महावितरण कट करत आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज भरले नाही, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. राज्यात वीज बील विरोधात आंदोलन सुरु आहेत.
पण आता ऊर्जामंत्री नितीन राऊत आंदोलकांना स्पष्ट इशारा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांचे वीजबिल थकले आहे. या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरण विभागाकडून सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

ऊर्जामंत्री नितीन राऊत हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण ऊर्जामंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. नितीन राऊत म्हणाले की, कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले याची माहिती आम्हांला आहे.
हेही वाचा
आजपासून गाईच्या दुधाला 30 रुपये खरेदी दर !
अतिरिक्त ऊसाबाबात सहकार मंत्री म्हणाले…!
एका रात्रीतून कांद्याचे दर घसले !
असा करा ट्रायकोडर्माचा वापर आणि पहा रिजर्ट !
कोरोना काळात सर्वत्र ताळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. जर वीज वापरली आहे तर पैसे द्यावेच लागतील. वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा