यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला हवा तसा दर मिळाला नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले. मात्र आता हंगाम अंतीम टप्प्यात येत असताना शिवाय युक्रेन-रशिया युद्धाची पार्श्वभूमी असतानाही सोयाबीचे दर वाढत आहेत. गेल्या 15 दिवसापासून सोयाबीनचे दर वाढत आहेत. नुकतेच लातूर बाजारात सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे.
खरीप हंगामातील सोयाबीनची जोमात वाढ सुरू होती. दरम्यान अतिवृष्टी तसेच सतत पाऊस लागून राहिल्यामुळे सोयाबीन चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यंदा सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. सोयाबीन हे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते मात्र यंदा पावसामुळे सोयाबीनचे एवढे नुकसान झाले होते तसेच हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला दरही मिळाला नाही. जो पर्यंत सोयाबीनला वाढीव दर मिळत नाही, तो पर्यंत सोयाबीन विकायचे नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. त्यांची मात्र आता चांदी झाली आहे. आजच्या स्थितीला सोयाबीनला विक्रमी दर मिळत आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे घटलेले सोयाबीन चे उत्पादन तर बाजारात वाढलेली सोयाबीनला मागणी आणि आता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध चालू असल्यामुळे जी परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळे अगदी शेवटच्या टप्यात सोयाबीनला चांगले दिवस आले आहेत. मागील १५ दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात असे काय झाले की; शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा विश्वास बसत नव्हता. दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरामध्ये वाढच होत निघाली. मंगळवारी लातूर मधील प्रक्रिया उद्योजकांनी सोयाबीनची सुमारे ७ हजार ७०० क्विंटल एवढी खरेदी केली आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा
आजपासून गाईच्या दुधाला मिळणार 30 रुपये खरेदी दर !
अतिरिक्त ऊसाबाबात सहकार मंत्री म्हणाले…!
एका रात्रीतून कांद्याचे दर घसले !
सध्या युक्रेन – रशिया देशांमध्ये युद्ध सुरू आहे जे की याचा परिणाम सोयाबीन वर होत आहे. रशिया, युक्रेन तसेच अर्जेंटिना मधून भारतात सूर्यफूल तेलाची आयात होते मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात बंद झाली आहे. ही याचे कारणच मुळात युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सूर्यफूल तेल निर्माण करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांनीही आता सोयाबीन खरेदीकडे मोर्चा वाळविला आहे. सूर्यफुलाची आयात बंद झाल्याने त्या उद्योजकांना आता सोयाबीनशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनची मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना हंगामाच्या अंतीम टप्प्यात चांगला फायदा होत आहे. भविष्यात सोयाबीनचे दर वाढणार की घटणार असा संभ्रम शेतकऱ्यांना आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇