किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बीत हमीभावाने (5230 रुपये प्रतिक्विंटल) शासकीय केंद्रावर हरभरा खरेदीसाठी कृषी विभागाच्या द्वितीय आगाऊ अंदाजानुसार राज्यातील 33 जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रति शेतकरी हरभऱ्याची खरेदी करावी, असे निर्देश सहकार, पणन, वस्त्रोउद्योग विभागालातर्फे देण्यात आले आहेत.

चालू हंगामात राज्यात हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्र शासनास सादर केलेल्या प्रस्तावास 17 फेब्रुवारी रोजी मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार 6.89 लाख टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हरभरा खरेदीसाठी 16 फेब्रवारीपासून शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. कृषी विभागाच्या द्वितीय आगाऊ अंदाजानुसार जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या उत्पादकतेनुसार प्रति शेतकरी हरभरा खरेदी आज (मंगळवार) पासून सुरू करावी असे निर्देश राज्य सहकारी पणन मासंघाचे व्यवस्थापनीकय संचालकांसह संबंधित विभागातर्फे देण्यात आले आहेत.
हेही वाचा
एकच चर्चा : गायीच्या डोहाळे जेवणाची
शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा ऊर्जामंत्र्यांचा इशारा
प्रति हेक्टरी हरभरा उत्पादकता (क्विंटलमध्ये)
नगर (7.50), पुणे (8.60), सोलापूर (6.50), सातारा (9.25), सांगली (11.06), कोल्हापूर (12.00), ठाणे (7.10), पालघर (7.50), रायगड (4.50), रत्नागिरी (4.90), परभणी (08.20), हिंगोली (11.00), नांदेड (11.50), लातूर (13.50), उस्मानाबाद (06.50), बीड (09.50), जालना (13.00), औरंगाबाद (5.80), बुलडाणा (11.82), अकोला (15.00), वाशीम (07.00), यवतमाळ (12.00), अमरावती (15.60), वर्धा (12.60), नागपूर (15.00), भंडारा (08.00), गोंदिया (08.10), चंद्रपूर (07.50), गडचिरोली (4.60), नाशिक (9.50) धुळे (10.97), नंदूरबार (13.96), जळगाव (13.00) अशा प्रकारे हरभऱ्याची उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा