महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या नंदुरबारच्या बाजारपेठेत सध्या लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली असली तरी मात्र मिरचीची उत्पादक्ता कमालीची ढासळली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकर्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलि आहे.
यंदा अवकाळी पावसानंतर दिर्घकाळ टिकून राहिलेल्या पावसामुळे सारेच जनजीवन विस्कळीत झाले. सतच्या पावसाने पिकांसाठी पोषक वातावरण राहिले नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम कीड-रोगांचा प्रार्दुभाव वाढला. निसर्गाच्या उदासीनतेमुळे यावर्षी मिरची या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे.

वातावरणातील बदलामुळे यंदा मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाला असून त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. परिणामी आवक कमी झाल्याने मिरचीच्या दरात वाढ झाली. मिरचीची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नंदुरबार कृषी बाजार समितीच्या या बाजारात सध्या दररोज 300 क्विंटल लाल मिरचीची आवक होते. त्याचा दर 4 ते 5 हजार रुपये क्विंटल गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर दुपटीने वाढला आहे, मात्र उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किमतीत वाढ झाली आहे, पण तरीही उत्पादन कमी झाल्यामुळे आम्हाला नफा मिळलेला नाही. लाल मिरचीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 2500 हेक्टरवर मिरचीची लागवड होते. जून महिन्यात लागवड केली जाते. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांत हिरवी मिरची तयार होते. हिरवी मिरची डिसेंबरपर्यंत येते. त्यानंतर महिनाभरात लाल मिरची येते. झाडावरच लाल रंग येतो. त्यानंतर छाटणी सुरू होते त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.

नंदुरबार बाजार समितीत हंगामाच्या सुरुवातीला लाल मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. त्यानंतर भावात घसरण सुरू असताना सुरुवातीला 1800 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. मात्र वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होऊ लागताच भाव वाढू लागल्याने लाल मिरचीचा भाव आता चार ते पाच हजार रुपयांवर पोहोचला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03/

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇