महाराष्ट्र राज्यातील वातावरणात मागील दोन ते तीन दिवसांत कमालीचा बदल झाला असून, राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूस काही भागांमध्ये तापमानात वाढ झालेली आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसात राज्यातील काही भागात विजेच्या कडकडासह तर काही भागात वादळी वार्यासह पाऊस पडणार असल्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविली आहे.

सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा मोठा परिणाम राज्यातील काही भागांमध्ये होत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली अहे. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह गुजरात, पूर्व राजस्थान तसेच पश्चिम मध्यप्रदेशात वादळाची आणि विजांच्या कडकड्याची परिस्थिती निर्माण होणार अहे. काही ठिकाणी तर हलका तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत. मुंबई प्रादेशिक हवामानाने तर काही जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा जारी केला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये या भागात पाऊस पडणार आहे तर काही ठिकानी तापमानात वाढ होणार आहे.

मुंबई प्रादेशीक हवामान विभागाने राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम तसेच हलका स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदिया, वर्धा तसेच भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील इतर ११ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली सून या सर्व जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे.
दरम्यान, पंजाबराव डख यांनीही ८ ते ११ या तारखे दरम्यान राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03/

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास हा लेख आवडला असल्यासखालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇