राज्यातील डाळिंब बागांची कीड-रोगाच्या प्रादुर्भावातून मुक्तता करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी विशेष लक्ष घातले असून, त्यांनी या संदर्भात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सुचना शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
डाळिंबावरील कीड-रोग नियंत्रणावरील प्रभावी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी डाळिंब बागांमधील कीड-नियंत्रणासंदर्भात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञ, फलोत्पादन विभागाचे अधिकारी, डाळिंब उत्पादक संघाचे प्रतिनिधी व डाळिंब उत्पादक शेतकरी प्रतिनिधी यांची यासंदर्भात मते जाणून घेतली.
सध्या राज्यात 1 लाख 71 हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आहेत. त्यापासून 17 लाख 95 हजार टनांपेक्षा जास्त उत्पादन घेतले जाते. डाळिंब बागांमधील कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बागांमध्ये पीन होल बोरर, रसशोषक कीड, सूत्रकृमी, फळकूज अशा समस्या आहेत. यापेक्षाही सध्या मररोग जास्त वेगाने पसरत असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकर्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कृषी आयुक्तांनी डाळिंबावरील कीड-रोग नियंत्रणावरील प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात पुणे, अहमदनगर, नाशिक व सोलापूर या जिल्ह्यात मोहिमा काढाव्यात, गुणवत्तापूर्ण कलमे व रोपांचा पुरवठा शेतकर्यांना होण्यासाठी रोपवाटिकांची कठोर तपासणी करावी, अशा सूचना बैठकीत दिल्या. तसेच, डाळिंब निर्यातवाढीसाठी ग्लोबल गॅप, इंडिया गॅप प्रणालीचा वापर वाढला पाहिजे. तसेच सोलापूर डाळिंबाला भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाल्याने त्याचा उपयोग शतकऱ्यांना होण्याकरिता मोहिमांमध्ये लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले. यावेळी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जोत्स्ना शर्मा, भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, संचालक आनंदराव पाटील, डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष शहाजीराव जाचक तसेच तिर अधिकारी व शास्त्रज्ञांनी चर्चेत भाग घेतला.
असे ठरले नियोजन : यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र, विद्यापीठे, डाळिंब उत्पादक संघ व कृषी विभागा संयुक्त कामे करणार आहेत. डाळिंब रोपवाटिकांची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय मोहिमा काढून शेतकर्यांना उपाय सांगण्यात येणार आहेत. फलोत्पादन अभियानातून उतिसंवधन प्रयोगशाळेची उभारणी होणार आहे. सोलापूर नाशिकच्या डाळिंब समूहात (पोमो क्लस्टर) काटेकोर व्यवस्थापनाला चालना देणार असून, शेतकऱ्यांपर्यंत कीड-रोग व्यवस्थापनाची तंत्रे पोहचविण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रत्यक्षिके व दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
अर्थसंकल्पात शेतीसाठी झुकतं माप : 23 हजार 888 कोटींच्या तरतुदी
कृषी व संलग्न कार्ये क्षेत्रात 4.4 % वाढ
यामुळे होईल आठवड्यात महागाईचा भडका
शास्त्रज्ञांनी केल्या या सूचना : कीड-रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डाळिंब उत्पादकांनी अतिधन लागवड टाळावी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, लागवडीतील अंतर 4.5 बाय 3 मीटर किंवा पाच बाय पाच मीटर ठेवावे, कीड नियंत्रणासाठी ड्रेंचिंग करू नये. मुळांच्या कक्षातील णाती व सूक्ष्म जिवाणूंचे सहजीवन जपाण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, पाण्याचा अतिवापर टाळावा. आठवड्यातून दोन वेळाच बागेला पाणी द्यावे व रोगमुक्त लागवड समग्रीचा वापर करावा अशा सूचना शास्त्रज्ञांनी केल्या.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇