विदर्भात कापसाला 50 वर्षातील रेकॉर्डब्रेक दर !

0
666

गेल्या 50 वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक करीत कापसाच्या दराने यादा विक्रम नोंदवीला. विदर्भातील कापूस खरेदी केंद्रावर हंगामाच्या सुरूवातीला 6 हजार रुपये क्विंटल या दरापासून सुरू झालेला कापासाचा दर सध्या 11 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना दरामध्ये झालेल्या वाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो की व्यापाऱ्यांना असा प्रश्‍नही उभा राहिला आहे.

यंदा कापूस उत्पादनातील घट आणि वाढती मागणी यामुळे गेल्या 50 वर्षात जे झाले नाही ते यंदा कापसाच्या दराबाबत झाले आहे. कमी दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आता काही दिवसांमध्येच दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला व्यापारी घरोघरी येऊन कापसाची खरेदी का करीत होते हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सेलू येथे तब्बल 10 हजार 900 प्रतिक्विंटल दर मिळाला. आता मोजक्याच शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. इतरांना मात्र, फरदडचा आधार घ्यावा लागत आहे.

विदर्भासह कापूस हे मराठावड्यातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीमुळे तोडणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचाच परिणाम संबंध हंगामातील दरावर राहिलेला आहे. बाजारपेठेत आवक घटल्यामुळे 6 हजारावरील दर आता जवळपास 11 हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचलेले आहेत. उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरामुळे भरुन निघालेली आहे. मात्र, याचा अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांचाच होत आहे.

फरदड कापासाचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे असतानाही घेतलेच. बाजारपेठेतील वाढते दर आणि मुबलक पाणीसाठा यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी होताच पुन्हा कापसाला पाणी देऊन पीक घेतले आहे. फरदडमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव तर वाढतोच पण शेतजमिनही नापिक होते. हे सर्व माहित असूनहा हंगामाच्या अंतिम टप्प्यातील दर पाहून शेतकऱ्यांनी आपला निर्णय बदलला आहे. त्यामुळेच विदर्भात अजूनही कापूस उभाच दिसत आहे.

👇👇👇 हेही वाचा 👇👇👇

अखेर वीज तोडणीसंदर्भात ठाकरे सरकारने केली घोषणा !

डाळिंब कीड-रोग नियंत्रणावर कृषी आयुक्तांचे लक्ष !

यंदा कसा असेल उन्हाचा चटका… काय आहे तापमानाचा अंदाज ?

गेल्या चार दिवसांपासून कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 10 मार्चपर्यंत खरेदी केंद्रावर कापसाला 10 हजार 200 असा दर होता. मात्र, दिवसागणीस कापसाच्या दरात वाढ होत आहे. 15 मार्च रोजी कापसाचे दर हे 10 हजार 900 रुपयांपर्यंत पोहचले होते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मागणी असल्यानेच ही दरवाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन घेतले तरी ते अल्प स्वरुपात असणार आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here