कांद्याच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना फायदा तर तोटा हा सहन करावाच लागतो. दर मिळाला तर राजा नाहीतर भिकारी अशी अवस्था कांदा उत्पादकांची होत असून, गेल्या महिन्यात 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेला कांदा आता थेट 1 हजाराच्या आत आला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारात कांद्याला अक्षरश: उतरती कळा आली आहे.
गेल्या आठवड्यातील शनिवारच्या तुलनेत बुधावारी लाल कांद्याच्या सर्वसाधारण बाजार भावात 425 रुपयांची प्रति क्विंटल मागे घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा दराचे चित्र झपाट्याने बदलत असून अजून उन्हाळी हंगाम पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. त्यामुळे भविष्यात हे दर कुठे येऊन ठेपतील हे सांगता येणार नाही.
देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी आणि लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची आवक ही लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम दरावर होऊ लागला आहे. एकंदरीत मागणी कमी आवक जास्त याचा हा परिणाम आहे. दीड महिन्यापूर्वी आवक अधिकची असतानाही दर टिकून होते, कारण मागणीही त्याच प्रमाणात होती. शिवाय केवळ खरिपातील कांदाच शेतकऱ्यांकडे होता. आता उन्हाळी हंगमातील कांदाही दाखल होऊ लागला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या तुलनेत बुधवारी कांद्याच्या सर्वसाधारण बाजारभावात 425 रुपयांनी घसरण झाली आहे. शनिवारी 1 हजार 267 वाहनातून 22 हजार 45 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर कमाल 1551 रुपये आणि किमान 500 रुपये व सर्वसाधारण 1300 रुपये प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला होता. सोमवारी 900 वाहनातून 32 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाला. त्याला कमाल 1180 रुपये, किमान 400 रुपये तर सर्वसाधारण 875 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
विदर्भात कापसाला 50 वर्षातील रेकॉर्डब्रेक दर !
अखेर वीज तोडणीसंदर्भात ठाकरे सरकारने केली घोषणा !
गेल्या आठवड्यात अवकाळी आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातला माल केव्हा बाजार समितीमध्ये दाखल होतोय यावरच भर दिला आहे. दर कमी मिळाला तरी चालेल पण वावरात नुकसान नको ही शेतकऱ्यांची भूमिका होती. त्यामुळे कमी कालावधीत आवक वाढली. याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. शिवाय अजून उन्हाळी हंगाम जोमात सुरु झालेला नाही. उद्या आवक वाढली तर असेच परिणाम पाहवयास मिळणार आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇