मागील दोन वर्षाप्रमाणे यंदाही (2022) महाराष्ट्रात पावसाळ्यातील चारही महिन्यात दमदार पाऊस पडणार आहे. ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने हा आनंदाचा अंदाज व्यक्त केला असून, यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगल्या आणि समाधानकारक पावसाचा आनंद घेता येईल असे संकेतही दिले आहेत.
ऑस्ट्रेलियन हवमान विभाग आपल्या अचूक अंदाजासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी वर्तवलेले गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्रातील पावसाचे अंदाज खरे ठरले आहेत. मात्र अद्याप भारतीय हवामान विभागाकडून पावसासंदर्भात कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन हवमान विभागाच्या अंदाजाला दूजोरा देणारा दुसरा अंदाज एक्सूवेकर या वेदर कंपनीने देखील जाहीर केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार यंदा भारतात दुष्काळ पडेल अशी कोणतीही परिस्थिती नाही, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

ऑस्ट्रेलियन हवमान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून अर्थात जूनच्या सुरुवातीपासून यंदाच्या पावसाळ्यात धो-धो पाऊस बरसणार आहे. यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात देखील सर्वसाधारण पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापूर्वी मात्र, तब्बल 8 वर्ष मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात महाराष्ट्राने दुष्काळ अनुभवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी संजीवनी देणारा ठरणार आहे.
👇👇👇 हेही वाचा 👇👇👇
आता टेस्ट ट्यूब द्वारे कालवडीचा जन्म
चक्क आता… रंगीत कापूस शेतात दिसणार !
शेततळ्यासाठी जागा निवडताना या बाबींचा विचार नक्की करा !
या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात 98 ते 104 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगितले गेले आहे. पावसाळा चांगला असला की, शेतीच्या उत्पादनात वाढ होते, पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण मिटते, मुक्या जनावरांना उन्हाळ्यात मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध होतो, यामुळे शेती व्यवसायाला गती मिळते, दुग्ध व्यवसायाला चालना मिळते. एकंदरीत चांगल्या पावसामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होणार आहे. या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सुखावले असून आगामी खरीप हंगामात निदान पावसाच्या बाबतीत तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
👇 आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇