दूध उत्पादक शेतकऱ्यांसासाठी आनंदाची बातमी आहे. वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. लोणी, दूध भुकटीसह दुग्धजन्य पदार्थाना मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यात सलग दोन वेळा गायीच्या दूध दरात वाढ झाली होती. आता म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी क्षेत्रातील डेअरींनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकूळ आणि वारणा दूध संघाने हा निर्णय घेतला असून, याच्या अंमलबजावणीला देखील सुरवात झाली आहे. आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थाना मागणी वाढली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून खरेदी दरात वाढ केली आहे.
👇👇👇 महत्त्वाच्या बातम्या 👇👇👇
अतिरिक्त ऊसाबाबत अजित पवारांनी दिले निर्देश
मराठवाडा विदर्भात फळपिकांच्या निर्यातीसाठी या उभारल्या जाणार पायाभूत सुविधा ?
सोयाबीन बियाण्याबाबत कृषी विभागाचा काय आहे सल्ला ?
31 मार्चपर्यंत म्हशीचे दूध 61 रुपये लिटर होते ते आता 1 एप्रिलपासून 64 रुपये लिटर झाले आहे. अनेक दिवसातून म्हशीच्या दूध दरात वाढ झाली आहे. तीन रुपयांनी झालेली वाढ ही शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारी आहे. दूध खरेदी आणि विक्री दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र खरेदीदारांना झळ बसू नये म्हणून विक्री दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे दूध कमी झाले आहे. त्यामुळे ही दूध दर वाढ झाली आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1