ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो.
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा प्रथम असून ज्वारीचे कोढार म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन हे राज्यातील सोलापूर, बीड, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात होते. परंतु ज्वारी काढणी, काढणी, मशागत, मळणी अशा कष्टाच्या कामांसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकरी नगदी पिकांवर भर देत आहेत.
आनंदाची बातमी : अतिरिक्त ऊसाच्या तोडणीसाठी कर्नाटकातून येणार तोडणी यंत्रे
जनावरांचा मुख्य चारा कडबा हा आहे. आता सध्या कडब्याला कमी मागणी आहे. परंतू येणाऱ्या काळात कडब्याची मागणी वाढणार आहे. कारण जून महिन्यात पाऊस झाल्यावर लगेच हिरवा जरा उपलब्ध होत नाही. त्यावेळी कडब्याची आवशक्यता भासते. जुलै-ऑगस्ट दरम्यान कडब्याला विक्रमी दर मिळणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या कळला कडब्याची मागणी आणि बाजारभाव देखील वाढणार आहेत.
हे नक्की वाचा : कापसावरील आयातशुल्क रद्द : दरातील तेजी कायम राहणार
महाराष्ट्रात ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात धान्य आणि चाऱ्यासाठी केली जाते. महाराष्ट्रातील ज्वारीच्या 28.58 लाख हेक्टर क्षेत्रापैकी खरिपात 6.28 लाख हेक्टर, तर रब्बीमध्ये 22.40 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. खरीप ज्वारीची उत्पादकता 11.70 क्विंटल प्रतिहेक्टर असून रब्बी ज्वारीची उत्पादकता फक्त 7.95 क्विंटल प्रतिहेक्टर एवढी आहे.
महत्त्वाची बातमी : यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस : स्कायमेटचा अंदाज
राज्यातील ज्वारीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे आहे. शेतकऱ्यांना ज्वारीपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे 2000 साली राज्यात 31 लाख 84 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यंदा केवळ 12 लाख 44 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1