महाराष्ट्रातील लक्षवेधी असलेले कांदा हे नगदी पीक यंदाच्या वर्षी अनेक कारणाने चर्चेचा विषय झाले आहे. कांदा पिकाची नुकसानी, त्याची वाढलेली आवक किंवा त्याला मिळलेला उच्चांकी दर यामुळे कांदा नेहमीच चर्चेत आहे. सध्या तो चर्चेत आहे तो त्याला कवडीमोल दर मिळत असल्याने ! सध्या सर्वत्र कांद्याची मोठी आवक वाढल्याने कांद्याचे दर पार घसरले आहेत.
महत्त्वाची बातमी : महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक ; बारामतीच्या शेतकऱ्यांना फटका
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल ते 800 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या मिळत असलेल्या दरात कांदा पिकासाठी झालेला खर्च देखील काढणे अवघड असल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे.
ही वाचा मान्सूनची बातमी : हवामान विभागाने जारी केला यंदाच्या मान्सूनचा पहिला अंदाज
सामान्य नागरिकांच्या डोळ्यातून पाणी काढणारा कांदा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढत असल्याचे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र एक रुपये किलो अर्थात शंभर रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल दर मिळाला आहे.
लक्षवेधी बातमी : ज्वारीपेक्षा कडब्याला मागणी
मागील वर्षी कांद्याला समाधानकारक बाजार भाव असल्याने या वर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झाली. विशेषता पैठण तालुक्यात उन्हाळी कांद्याची लागवड केली गेली आहे. सध्या तालुक्यासमवेतच संपूर्ण राज्यात उन्हाळी कांदा काढण्याचे काम सुरु आहे. उन्हाळी कांदा काढणी केल्यानंतर शेतकरी बांधव कवडीमोल दर मिळत असल्याने साठवणुकीवर भर देत आहेत मात्र असे असले तरी साठवणुकीसाठी देखील शेतकऱ्यांवर काही मर्यादा आहेत.
हे नक्की वाचा : 27 कीटकनाशकांवर केंद्र सरकार आणणार बंदी
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांदा चाळीत बसेल तेवढा कांदा साठवणूक करून ठेवत आहेत आणि बाकीचा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत. यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत आपला सोन्यासारखा कांदा विक्री करावा लागत आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
👇 https://www.instagram.com/shetimitra03/ 👇
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1